Thursday, March 13, 2025
Home बॉलीवूड ललित मोदींसोबतच्या नात्यावरून ट्रोल झालेल्या सुष्मिता सेनने शेअर केला ‘असा’ फोटो, स्माईलने दिलं उत्तर

ललित मोदींसोबतच्या नात्यावरून ट्रोल झालेल्या सुष्मिता सेनने शेअर केला ‘असा’ फोटो, स्माईलने दिलं उत्तर

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) सध्या खूप चर्चेत आहे. खरं तर, बिझनेसमॅन ललित मोदी यांनी सुष्मिताला डेट करत असल्याचा खुलासा करताच, त्या दोघांनाही ट्रोल केलं जात आहे.

ललित मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली होती. मात्र, युजर्सना दोघांचे हे नाते आवडले नाही आणि दोघांना ट्रोल व्हावे लागले. लोक सुष्मिता सेनला लोभी आणि गोल्ड डिगर म्हणू लागले. इतकंच नाही, तर सुष्मिता पैशांमुळे ललित मोदींसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे. या सर्व प्रकारानंतर अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले. (sushmita sen shares latest photos after trolled)

समोर आला लेटेस्ट सेल्फी
दरम्यान, आता सुष्मिता सेनने तिचा लेटेस्ट सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री खूप आनंदी आणि हसतमुख दिसत आहे. हा फोटो शेअर करताना तिने तिच्या चाहत्यांसाठी एक गोंडस कॅप्शनही दिले आहे. तिने लिहिले, “आई लव यू मित्रांनो.”

नेटकऱ्यांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया
विशेष म्हणजे, सुष्मिता सेन ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. त्याचबरोबर तिच्या या लेटेस्ट फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे आणि तिची स्टाइल सोशल मीडिया यूजर्सनाही पसंत केली जात आहे. कमेंट सेक्शनमध्येही लोक तिच्या सौंदर्याची खूप प्रशंसा करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा