Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

ही आयुष्यभर पुरणारी शाश्वती! ”स्वामीसुत” भूमिकेचा शेवट झाल्यानंतर मराठी अभिनेत्याने केलेली पोस्ट ‘ती’ व्हायरल

मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय अशी मालिका म्हणजे ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. स्वामींचे विविध चमत्कार, समाजासाठी उपयुक्त निर्णय, समाज सुधारणा, विविध माहित असलेल्या नसलेल्या कथा आदी अनेक गोष्टी या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वीच या मालिकेमध्ये ‘स्वामीसुत’ या नवीन पर्वाचा आरंभ झाला होता. आता याच पर्वाचा अंत झाला आहे. त्यानिमित्ताने स्वामीसुत ही भूमिका साकारणराय अभिनेता विकास पाटीलने एक सुंदर पोस्ट शेअर करत त्याचा अनुभव सांगितला आहे.

विकासने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याचे काही फोटो आणि सहकलाकारांचे काही फोटो शेअर करत लिहिले, “स्वामीसुत पर्वाचा शेवटचा भाग आज प्रदर्शित होतोय… खूप काही मिळालं या प्रवासात !!

 

View this post on Instagram

 

A post shared by Vikas Patil (@vikaspatil.official)

स्वामींचे कसे आभार मानावेत तेच कळत नाहीये .. इतक्या कमी कालावधीत एक अखंड आयुष्य जगल्याचा अनुभव मिळाला, प्रत्येक पात्र तुम्हाला काही ना काही देऊन जात असतं..पण या पत्राने जगणं शिकवलं, गुरुंप्रती नितांत श्रद्धा ठेवणं शिकवलं, कठीण काळात जराही न डगमगता आपल्या गुरूंवर अढळ विश्वास ठेवून लढणं आणि पुढे जात राहणं शिकवलं, संसारात राहूनही वैराग्य कसं सांभाळावं हे शिकवलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ”भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” ही आयुष्यभर पुरणारी शाश्वती मिळाली !! माझ्या पूर्वपुण्याईनेच “स्वामीसुत” साकारायची संधी मिळाली”

यानंतर त्याने सर्वांचे आभार मानत लवकरच नवीन भूमिकेत भेटणार असल्याचे सांगितले आहे. विकासाच्या या पोस्टवर त्याच्या फॅन्सने भरभरून कमेंट्स करत त्याचे काम आणि त्याची भूमिका आवडल्याचे सांगितले. सोबतच त्याच्या भूमिकेमुळेच अनेकांना ‘स्वामीसुत’ यांच्याबद्दल माहिती मिळाली असे देखील म्हटले आहे.

दरम्यान विकास पाटील हा मराठी टेलिव्हिजन विश्वातील ओळखीचा आणि लोकप्रिय चेहरा आहे. त्याने अनेक उत्तम मालिकांमध्ये काम केले असून, त्याला मोठी ओळख मराठी बिग बॉसमुळे मिळाली. आता विकास नवीन कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येतो हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

अधिक वाचा- 
सलमानच्या नावे फेक कॉल्स… भाईजानने दिला ‘हा’ थेट इशारा; वाचा काय घडले?
दीपा चौधरी हिच्या घायाळ करणाऱ्या अदांवर चाहते फिदा

हे देखील वाचा