Monday, April 28, 2025
Home बॉलीवूड नुपूर शर्माचा पुतळा जाळल्याने भडकली स्वरा भास्कर; म्हणाली, ‘मॉब लिंचिंगवरही तेच…’

नुपूर शर्माचा पुतळा जाळल्याने भडकली स्वरा भास्कर; म्हणाली, ‘मॉब लिंचिंगवरही तेच…’

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानावरून गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात गदारोळ सुरू आहे. नुपूरच्या वक्तव्यानंतर देशभरात ठिकठिकाणी निदर्शने होत आहेत. त्यांच्या अटकेची मागणीही अनेक ठिकाणी होत आहे. अशा परिस्थितीत आता मनोरंजन जगतही या वादावर खुलेपणाने आपले मत मांडत आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) आणि अभिनेत्री कंगना रणौतनंतर (Kangana Ranaut) बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनेही (Swara Bhaskar) या संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर स्वराने नूपूरच्या हिंसक निषेधाला विरोध केला आहे. पोस्टमध्ये अभिनेत्रीने नुपूर शर्माच्या चेहऱ्यासोबत पुतळा टांगला जाणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. खरं तर, अलीकडेच, माजी भारतीय क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांनी एक ट्वीट केले होते. ज्यामध्ये ते कर्नाटकमध्ये नुपूर शर्माच्या पुतळ्याला फासावर लटकवल्याचा निषेध करताना आणि ते बंद करण्याचे आवाहन करताना दिसले. (swara bhaskar got furious over burning nupur sharma effigy in karnataka)

क्रिकेटरच्या याच ट्वीटला रिट्विट करत स्वराने लिहिले, “मी यांच्याशी सहमत आहे. मला आशा आहे की, आपल्या सर्वांना गोमांसाच्या नावाखाली होणाऱ्या मॉब लिंचिंगची अशीच भीती वाटेल आणि राजस्थानच्या राजसमंदमध्ये कथित लव्ह जिहादच्या संशयावरून एका गरीब स्थलांतरित मजुराला जिवंत जाळण्यात आले. हे तरी पुतळे आहेत, ते खरे लोक होते. आपली भीती ओळखीवर आधारित नसावी.”

यासोबतच अभिनेत्रीने आणखी एका ट्वीटमध्ये लिहिले की, “हिंसा… चुकीच्या असण्यासोबतच न्यायाच्या पद्धती आणि वैध कारणांची बदनामी करते. हिंसा… अमानवीय, अनैतिक आणि वाईट राजकीय रणनीती आहे. हे महात्मा गांधींपेक्षा चांगले कोणीही समजू शकत नाही. पीडितांना हिंसेसाठी उकसावणे देणे हे सापळ्यासारखे आहे. त्यात अडकू नका.”

यापूर्वी अभिनेत्री कंगना रणौत आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही या प्रकरणी नुपूर शर्माला उघडपणे पाठिंबा दिला होता. विशेष म्हणजे महंमद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याने, नुपूर शर्मांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. याप्रकरणी भारतीय जनता पक्षाने आपल्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केले आहे. मात्र, त्यानंतरही हे प्रकरण थांबण्याचे नाव घेत नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा