प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुननाथ उर्फ केके (KK) यांचे निधन संगीत उद्योगासाठी एक मोठे नुकसान आहे. केकेने आपल्या गायन कारकिर्दीत अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत, जी सदाबहार गाण्यांच्या यादीत समाविष्ट आहेत. दरम्यान, ३१ मे २०२२ रोजी कोलकाता ऑडिटोरियममध्ये एका कॉन्सर्ट दरम्यान त्यांचे निधन झाले. स्टेडियममध्ये योग्य सुविधा नसल्यामुळे केके यांना जीव गमवावा लागल्याचे बोलले जात आहे. यावर अनेक कलाकारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आता लोकप्रिय गायक अर्जुन कानुंगोलाही (Arjun Kanungo) त्याच्यासोबत झालेला एक अपघात आठवला आहे.
एका मीडिया हाऊसशी नुकत्याच झालेल्या संभाषणात अर्जुनने सांगितले की, त्यानेही कोलकाता स्टेडियममध्ये परफॉर्म केले होते आणि त्याला श्वास घेण्यात त्रास होत होता. अभिनेता म्हणाला, “मला श्वास घेता येत नव्हता. हे विचित्र आहे की, इतकी गरमी असूनही एसी चालू नव्हता. या खूप जुन्या सभागृहामध्ये सुविधा अजिबात चांगल्या नाहीत. ही एक मोठी समस्या आहे. ही सभागृहे अधिक चांगली व्हायला हवीत. सभागृहाच्या व्यवस्थापकाला माहिती होती की नाही माहीत नाही. जर त्यांची तब्येत बरी नाही हे त्यांना माहित होते, तर त्यांनी शो बंद करायला हवा होता.” (arjun kanungo told on kk death at kolkata auditorium)
गायकाने त्याच्या शूट शेड्यूल आणि आयोजकांबद्दलही सांगितले. तो म्हणाला, “आम्ही शूट करतो तेव्हा प्रत्येक कॉलशीटमध्ये जवळच्या हॉस्पिटल आणि पोलिस स्टेशनचा तपशील असतो. आयोजकांनी जवळचे रुग्णालय कोठे आहे हे शोधणे आवश्यक आहे. कलाकाराची तब्येत बरी नसल्याचं आयोजकांना कळलं, तर त्यांनी लगेच त्यावर काम करावं.”
दरम्यान अर्जून कानुंगो हा एक लोकप्रिय गायक आहे. त्याची गाणी चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा