Tuesday, June 18, 2024

‘खूपच विषारी आणि कट्टर…’ स्वरा भास्करने साधला दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीवर निशाणा

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे त्यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या सिनेमानंतर चांगलेच गाजत आहे. त्यांना या सिनेमाने एक वेगळी ओळख आणि नावलौकिक मिळवून दिला. या सिनेमानंतर विवेक हे सतत विविध मुद्द्यांवर त्यांचे मत सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडताना दिसतात. आपल्या स्पष्ट विचारांसाठी आणि बोलण्यासाठी ते ओळखले जातात. विवेक अनेकदा त्यांच्या मतांमुळे ट्रोल होताना देखील दिसतात. सध्या सोशल मीडियावर विवेक अग्निहोत्री आणि एक पत्रकार यांच्यात शाब्दिक युद्ध चालू आहे. दादासाहेब पुरस्कार मिळाल्यानंतर विवेक यांनी केलेल्या एका ट्विटवरून हे वाक्युद्ध सुरु आहे. आता या ट्विटर वॉरमध्ये अभिनेत्री स्वर भास्करने देखील उडी मारली आहे. तिने ट्विट करत विवेक अग्निहोत्रीवर निशाणा साधला आहे.

स्वर भास्करने विवेक अग्निहोत्री यांना उद्देशून केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “अभद्र भाषेचा वापर, केवळ मुस्लिम आहे म्हणून सार्वजनिक ठिकाणी मुस्लिम लोकांवर आरोप लावणे या अनेक गोष्टींसाठी विवेक अग्निहोत्री हे एक मोठे उदाहरण आहे, की ‘न्यू इंडिया’ किती विषारी, कट्टर आणि बहुसंख्यांक झाला आहे.”

तत्पूर्वी विवेक अग्निहोत्री यांचा फॅक्ट चेकर पत्रकार मोहम्मद जुबेर यांच्याशी वाद सुरु झाला होता. या वादामध्ये नंतर स्वरा भास्करने उडी मारत हे ट्विट केले. विवेक आणि मोहम्मद जुबेर यांच्यामध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ या सिनेमाला मिळालेल्या दादासाहेब फाळके पुरस्कारावरून वाद सुरु झाला. विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या द काश्मीर फाइल्स सिनेमाला दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म पुरस्कार मिळाल्याचे सांगताना एक ट्विट केले होते. त्यानंतर मोहम्मद जुबेर यांनी विवेक यांच्यावर निशाणा साधत म्हटले होते की, “हा तो सन्मान नाही जो तुम्ही समजत आहेत. हा त्या सन्मानासारखा आहे.”

मोहम्मद जुबेर यांच्या ट्विटला उत्तर देताना विवेक यांनी जुबेर यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, त्यांना फॅक्ट चेकर अजिबात आवडत नाही. त्यांनी पुढे लिहिले, “मला फॅक्ट चेकर अजिबात आवडत नाही. मात्र मला खूप राग येतो जेव्हा कोणी पंक्चर रिपेयर करणारा स्वतःला फॅक्ट चेकर सांगतो. तू तर कोणीच नाही फक्त एक दलाल आहेस. आणि मला पूर्णपणे माहित आहे की, तुमच्यामागे कोण आहे. प्रत्येक जिहादीचा दिवस येतो.” विवेक यांच्या या पोस्टवर सतत नेटकर्त्यांच्या कमेंट्स येत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तारक मेहता…’च्या दयाबेन यांचा नवीन व्हिडिओ व्हायरल, कुटुंबासोबत दिसल्या अभिनेत्री दिशा वाकाणी

‘रामायण’मध्ये ‘मंथरा’ बनण्यापूर्वी ‘या’ सर्वोत्तम भूमिका साकारत ललिता पवार यांनी गाजवले प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य, टाका एक नजर

हे देखील वाचा