Sunday, February 23, 2025
Home टेलिव्हिजन पंचेचाळीस वर्षाचा मिका करणार अर्ध्या वयाच्या मुलीशी लग्न, स्थळ घेऊन आल्या ‘या’ सुंदरी

पंचेचाळीस वर्षाचा मिका करणार अर्ध्या वयाच्या मुलीशी लग्न, स्थळ घेऊन आल्या ‘या’ सुंदरी

गायक मिका सिंगचा (Mika Singh) स्वयंवर ‘मिका दी वोहटी’ सुरू झाला आहे. या स्वयंवरचा भव्य प्रीमियर १९ जून रोजी प्रसारित झाला, ज्यामध्ये टीव्ही आणि चित्रपटातील अनेक प्रसिद्ध कलाकार पोहोचले आणि त्यांनी स्वयंवरात कोणतीही कसर बाकी सोडली नाही. शाहीर शेख, रवीना टंडन, दलेर मेहंदी, शान, कपिल शर्मा, कृष्णा अभिषेक, हिबा नवाब, करण वाही, नियती फतनानी, इशान धवन, पंखुरी अवस्थी, दिव्यांका त्रिपाठी वेगवेगळ्या स्टाइलमध्ये मंचावर दिसले.

सर्व कलाकारांनी एकापेक्षा एक जबरदस्त परफॉर्मन्स दिला. इतकेच नव्हे, तर त्यांनी स्पर्धकांचे आणि मिका सिंगचे अभिनंदनही केले. पण प्रेक्षकांच्या मनात प्रश्न अजूनही कायम आहे की, त्या भाग्यवान मुली कोण आहेत, ज्यांना ‘मिका दी वोहटी’मध्ये दिसण्याची आणि गायकासोबत लग्न करण्याची संधी मिळाली आहे. स्टार भारतवर सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजता येणाऱ्या या शोची सनई वाजली आहे. (swayamvar mika di vohti know everything about 12 contestants)

राखी सावंत, रतन राजपूत आणि राहुल महाजन यांच्यानंतर आता ४५ वर्षीय मिका सिंगही स्वयंवर ‘मिका दी वोहटी’ या माध्यमातून आपला जीवनसाथी शोधण्यासाठी बाहेर पडला आहे . यामध्ये १२ मुली आहेत, ज्या देशाच्या विविध ठिकाणाहून आल्या आहेत. मात्र, आतापर्यंत केवळ ८ जणांचीच ओळख सांगितली गेली आहे, ज्यांनी वैयक्तिक आयुष्यात बरेच काही मिळवले आहे. तर चला जाणून घेऊया.

‘या’ आहेत शोच्या स्पर्धक
या शोमध्ये आश्लेषा, बुशरा, चंद्राणी राज, ध्वनी, दिव्या, प्रांतिका दास, सोनल आणि नीत या मुलींनी सहभाग घेतला आहे. यामध्ये मिका त्यांना वेगवेगळे टास्क देणार आहे आणि या मुली त्याला इम्प्रेस करत टास्क पूर्ण करतील.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा