Tuesday, June 6, 2023

Mika Di Vohti | मिका सिंगला पाहून अनियंत्रित झाली मुलगी, स्टेजवर केले ‘असे’ काही की घाबरला गायक

चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक मिका सिंगचा (Mika Singh) आगामी शो ‘मिका दी वोहटी’ सध्या प्रचंड चर्चेत आहे. शो सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना, मिका कोणाला आपली वधू बनवणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. दरम्यान, या शोशी संबंधित काही प्रोमो स्टार भारतच्या इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलवर सतत शेअर केले जात आहेत, ज्यामध्ये मिका त्याच्या शोसाठी खूप उत्सुक दिसत आहे. दरम्यान, या शोशी संबंधित एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक मुलगी मिकाला पाहून खूप एक्साइटेड होताना दिसत आहे. मुलगी इतकी एक्साइटेड आहे की, तिला पाहून मिकाही थक्क होतो. 

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये एक मुलगी हातात प्लेट घेऊन स्टेजवर एंट्री करते. स्टेजवर येताना मुलगी खूप एक्साइटेड होते, जे पाहून मिकाही थांबण्याचे इशारे करतो. यानंतर ती मुलगी स्टेजवर येते आणि येताच ती मिकाला मिठी मारते आणि किस करते. तिची उत्सुकता पाहून मिकाही थक्क  होतो आणि म्हणतो ‘कंट्रोल उदय कंट्रोल…!’ यानंतर मुलगी ‘नाही होत’ म्हणते. (mika di vohti contestant bushra kiss mika singh in front of anyone)

आतापासून ५ दिवसांनी म्हणजेच १९ जूनपासून स्वयंवर ‘मिका दी वोहटी’ प्रसारित होणार आहे. जो रात्री ८ वाजता स्टार भारत टीव्ही वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मिकाच्या या स्वयंवर शोमध्ये, देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या बारा मुली सहभागी झाल्या आहेत. अशा परिस्थितीत या १२ अविवाहित मुलींपैकी कोण मिका सिंगची वधू बनणार, हे पाहणे रंजक ठरेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा