बाॅलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन नंदा हे बॉलीवूडमधील स्टारकीड मध्ये सर्वाधिक चर्चेत राहिले आहेत. मात्र, आता दोघेही खूप मोठे झाले असून दाेघांनीही संसार थाटला आहे. श्वेता बच्चनचा मुलगा अगस्त्य नंदा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याचबरोबर मुलगी नव्या नंदा ही चित्रपट जगतापासून दूर स्वत:चा पाॅडकास्ट चालवत आहे. अलिकडेच नव्या नवेली नंदा हिच्या पाॅडकास्टमध्ये श्वेताने बालपणीबद्दल अनेक खुलासे केले ज्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.
अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि श्वेता बच्चन (Sweta Bachhan) लहानपणापासूनच एकमेकांच्या जवळ आहेत. श्वेता तिचा भाऊ अभिषेककडून पैसे उधार घेत असे. एवढेच नाही तर श्वेता बच्चन नंदाने लग्नानंतरही नोकरी केली. ज्यामध्ये तिला 3 हजार रुपये पगार मिळत होता. या सर्वांचा खुलासा स्वत: श्वेता बच्चन हिने लेक नव्या नवेली नंदा हिच्या पाॅडकास्टमध्ये केला आहे.
View this post on Instagram
तर झाले असे की, नव्याने तिच्या कुटुंबातील तीन पिढ्यांतील महिलांसाेबत तिचा दृष्टिकोन शेअर केला आहे. ज्याचा पाॅडकास्ट नुकताच रिलीज झाला आहे, ज्यामध्ये नव्यासोबत तिची आजी जया बच्चन, आई श्वेता बच्चन नंदा आणि नव्या नवेली नंदा त्यांचा दृष्टिकोन शेअर करताना ऐकायला येत आहेत. यासोबतच श्वेता बच्चनने तिच्या बालपणीच्या आठवणीही या पॉडकास्टमध्ये शेअर केल्या आहेत.
नव्याशी बोलताना श्वेता बच्चनने सांगितले की, “लहानपणी ती शाळेत शिकायची तेव्हा तिचा भाऊ अभिषेककडून पैसे उधार घ्यायची.” याचे कारण विचारल्यावर श्वेता सांगते की, मी बोर्डिंग स्कूलमध्ये शिकत असे. बोर्डिंग स्कूलमध्ये अन्न ही एक मोठी गाेष्ट हाेती. अशा परिस्थितीत मला खाद्यपदार्थ घेण्यासाठी पैशांची गरज भासत असे. यामुळे मी अभिषेककडून पैसे उधार घेत असे.”
View this post on Instagram
तसेच पैशांच्या मेनेजमेंटबाबत श्वेता सांगते की, “लग्नानंतर मी दिल्लीतील बालवाडी शाळेत सहाय्यक शिक्षिकेची नोकरी केली आहे. ज्यामध्ये मला 3 हजार रुपये पगार मिळत होता. जे श्वेताने तिच्या बँक खात्यात जमा केले.”
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हर हर महादेव I ‘तो अक्षय कुमार असो नाही तर दुसरा कोणी…’, संभाजीराजे कडाडले
अर्रर्र! ‘या’ कारणांमुळे बाहुबली अभीनेत्री अनुष्का शेट्टीने कापले लांब केस