Friday, July 5, 2024

उर्वशी रौतेला पोहोचली ऑस्ट्रेलियाला; नेटकरी म्हणाले, ‘ऋषभ पंतचा पाठलाग…’

बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला(Urvashi Rautela) हिचे भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत(Rishabh Pant) वरील प्रेम कुणापासून लपलेले नाही. ती सोशल मीडियावर अप्रत्यक्षपणे व्यक्त करत असते. कधी उर्वशी पंतला टोमणे मारताना तर कधी ऋषभ तिला उत्तर देताना दिसला. टीम इंडिया टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झालाय. या स्पर्धेत भारतीय संघ त्यांचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी 23 ऑक्टोबर रोजी खेळणार आहे. आता नुकतीच उर्वशीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे आता अनेक नेटकरी उर्वशीला ट्रोल करत आहेत.

उर्वशी रौतेलाने स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही पोस्ट शेअर केल्या आहेत. यादीत दोन पोस्ट विमानातील आहेत आणि तिने यात तिने असा सांगितले आहे की, ती आता ऑस्ट्रेलियात पोहोचली आहे. उर्वशीने रविवार, 8 सप्टेंबर रोजी इंस्टाग्रामवर एकूण सहा पोस्ट शेअर केले. तिने विमानातील एका पोस्टवर असेही लिहिले आहे की, “ती स्वतःच्या प्रेमाचा वाठलाग करत ऑस्ट्रेलियाला चालली आहे.” उर्वशी आणि ऋषभ यांच्या नात्याची चर्चा पुन्ह जोरदार रंगली दिसते. अनेकांच्या मते उर्वशी पंतच्या मागेच लागली आहे

उर्वशीने शेअर केलेल्या पोस्टखाली कॅप्शनमध्ये तिने शायरी शेअर केली आहे. एका पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “कोई इतना बेदर्द कैसे बन जाए कि किसी की तड़प पर किसी को तरस ही ना आए..!!” तसेच दुसऱ्या एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, ”आईना आज फिर रिश्वत लेता पकड़ा गया, दिल में दर्द था और चेहरा हंसता हुआ पकड़ा गया।” उर्वशीच्या या शायहीनंतर पंतच्या चाहत्यांकडून मजेदार कमेंट्स येत आहेत. अनेकांनी लिहिले आहे की, ‘सात समुंदर पार मैं तेरे पीछे-पीछे आ गई’ अशी कमेंट उर्वशीच्या फोटोवर एका नेटकऱ्यानं केली आहे. तर दुसऱ्या युझर्सनं लिहिलं, ‘ऋषभ पंतच्या मागे गेली.’ काही नेटकऱ्यांनी उर्वशीला क्रिकेट सामना पहायला न जाण्याचा सल्ला देखील दिला आहे. पोस्टवर अशाच प्रकारच्या अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, उर्वशी आणि पंतचे हे प्रकरण उर्वशीच्या एका विधानामुळे सुरू झाले. यावेळी तिने पंतचे नाव न घेता ‘मिस्टर आरपी’ आणि ‘छोटू भैया’ असे शब्द त्याच्यासाठी वापरले होते. त्यानंतर उर्वशी आशिया चषक 2022 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात स्टेडियममध्ये उपस्थित राहिली. नंतर तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात ती पंतची माफी मागताना दिसली. पण हे प्रकरण तरीही शांत झालेले दिसत नाही. आथा उर्वशी ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन काय करते याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा –
प्रयाेग करावे, तरी किती! केसरिया गाण्याचं भाेजपुरी व्हर्जन रिलीज; चाहते म्हणाले, “केसरिया कधीच…”

बिग बॉस 16 मध्ये होणार नव्या सेलिब्रिटीची धमाकेदार एन्ट्री, प्रोमो होतोय तुफान व्हायरल

हे देखील वाचा