×

तापसी पन्नूला ५० मिनिटात ५० लाखाचे जुगाड करायचे असेल, तर मध्यरात्रीही ‘या’ व्यक्तीला करणार कॉल

‘द कपिल शर्मा शो’मध्ये दर आठवड्याला कलाकार त्यांच्या चित्रपट आणि वेबसिरीजचे प्रमोशन करण्यासाठी येतात. ज्यांच्यासोबत कपिल आणि त्याच्या टीम खूप धमाल करत असतात. या आठवड्यात, तापसी पन्नू आणि ताहिर राज भसीन त्यांच्या आगामी चित्रपट ‘लूप लपेटा’च्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये दिसणार आहेत. ज्यांच्यासोबत कपिल आणि त्याची टीम खूप धमाल करणार आहेत. शोच्या एका सेगमेंटमध्ये किकू शारदा तापसी पन्नूसोबत मस्ती करताना दिसणार आहे. (taapasee pannu reveals whom she will call if she has to arrange 50 lakh in 50 minite)

यादरम्यान तो तापसीसोबत त्याच्या चित्रपटांमध्ये मस्ती करताना दिसणार आहे. ‘द कपिल शर्मा शो’ (the kapil sharma) चा एक प्रोमो प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये कपिल तापसी आणि ताहिरला मजेदार प्रश्न विचारताना दिसत आहे. कपिल म्हणतो की, “तापसीला या सिनेमात ५० मिनिटांत ५० लाख रुपयांची उलाढाल करायची आहे, पण असं कधी झालं तर तुझा मित्र कोण आहे ज्याला तुम्ही मध्यरात्री कॉल करशील?”

View this post on Instagram

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

कपिलच्या प्रश्नाला उत्तर देताना, तापसी पन्नू म्हणते की, “त्या परिस्थितीतही मी माझ्या वडिलांना आधी कॉल करेन. कारण माझ्याकडे ५० लाख आहेत की नाही, हे आधी त्यांना विचारण्यासाठीही फोन करावा लागेल.” तापसीच्या उत्तरावर खिल्ली उडवत कपिल म्हणतो की, “पैसे कमावले जात आहेत, मोजायला वेळ नाही.”

एका सेगमेंटमध्ये कृष्णा अभिषेक सपनाच्या रूपात येतो. तो ताहिरला सांगतो की, “तुझ्या कुटुंबातील सर्वजण हवाई दलात आहेत. तुझे आजोबा वायुसेनेत होते, तुझे वडील वायुसेनेत होते. म्हणजे सगळे एअरफोर्समध्ये होते आणि तुम्ही फक्त फोर्समध्ये होता, कशी, तुमची हवा कुठे गेली?” हे ऐकून सगळे हसायला लागतात. यावर उत्तर देताना ताहिर म्हणतो की, “त्याच्यात आणि माझ्यात फरक एवढाच आहे की, तो ढगांमध्ये उडायचा आणि मी ताऱ्यांसोबत.”

त्यांची ही प्रोमोमधील मस्ती पाहून प्रेक्षक हा एपिसोड बघण्यासाठी खूप उत्सुक आहेत. तापसी पन्नू आणि ताहिर राज भसीन यांचा ‘लूप लपेटा’ हा चित्रपट ४ फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

Latest Post