Wednesday, March 22, 2023

गुलाबी रंगाच्या साडीत खुलले आर्चीचे सौंदर्य, पाहून तुम्हीही म्हणाल, याड लागलं

‘सैराट’ फेम रिंकू राजगुरुने आता चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिच्या अभिनयाने तिने सगळ्यांनाच भुरळ घातली आहे. अगदी कमी वयात तिने एवढी लोकप्रियता मिळवली आहे. रिंकू सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती चाहत्यांना नेहमीच भुरळ घालत असते. रिंकूच्या लूकमध्ये आता बराच बदल झाला आहे. अशातच तिने काही साडीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

रिंकूने (rinku rajguru)  शेअर केलेल्या या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने गुलाबी रंगाची सुंदर अशी साडी नेसली आहे. यावर तिने फुल स्लिव्ह निळ्या रंगाचा ब्लाऊज घातला आहे. तसेच सगळे केस मोकळे सोडून कपाळी टिकली लावली आहे. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (Rinku rajguru share her beautiful photos on social media)

हे फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “गुलाबी दिवस.” तिचा हा सुंदर आणि मोहक लूक तिच्या चाहत्यांना वेड लावत आहे. अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देऊन तिचे कौतुक करत आहेत.

रिंकूच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने वयाच्या पंधराव्या वर्षी २०१६ मध्ये चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला. तिने ‘सैराट’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शंभर कोटीपेक्षाही जास्त बिजनेस केला होता. तसेच या चित्रपटाचा हिंदीमध्ये ‘धडक’ नावाचा रिमेक देखील झाला आहे. त्यानंतर तिने ‘कागर’ आणि ‘मेकअप’ या चित्रपटात काम केले आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा