Monday, February 24, 2025
Home बॉलीवूड तापसी पन्नूच्या लग्नासाठी आई- वडील चिंतेत; म्हणाले, ‘आता कोणाशीही लग्न कर…’

तापसी पन्नूच्या लग्नासाठी आई- वडील चिंतेत; म्हणाले, ‘आता कोणाशीही लग्न कर…’

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या अनेक सुपरहिट चित्रपटात काम करून यश मिळवत आहे. तिच्या व्यावसायिक आयुष्यामुळे ती खूप चर्चेत असते. परंतु तिचे वैयक्तिक आयुष्य ती सहसा कोणासमोर मांडत नाही. खरं तर इतरांनी तिच्या कामाशिवाय तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोललेलं तिला अजिबात आवडत नाही. नुकतेच काही दिवसांपूर्वी तिने सांगितले आहे की, तिचे आई-वडील तिच्या लग्नासाठी टेन्शनमध्ये आहेत. सोबतच तिने हे देखील सांगितले आहे की, ती तिच्या आई- वडिलांच्या मर्जीविरुद्ध लग्न करणार नाहीये.

तापसीने एका मुलाखतीत सांगितले की, ती कधीही त्या व्यक्तीसोबत लग्न करणार नाही, जो तिच्या आई- वडिलांना आवडत नाही. तापसीने पुढे सांगितले की, ती कधीच कोणासोबत टाईमपास रिलेशनशिपमध्ये येणार नाही. परंतु ती ज्या व्यक्तीसोबत डेट करत आहे, तो जर तिच्या आई- वडिलांना आवडला नाही, तर ती त्याच्यासोबत लग्न करणार नाही. (Taapasee pannu says her parents are worried about her wedding)

तापसीने सांगितले की, “मी ज्यांना कोणाला डेट केले आहे. त्यांना मी नेहमीच हे सांगितले की, मी माझ्या आई-वडिलांच्या मर्जीशिवाय लग्न करणार नाही. माझ्यासोबत नेहमीच असे झाले आहे की, मी ज्याच्यासोबत डेट करते त्याच्याबाबत माझ्या मनात हाच विचार येतो की, याच्याशी लग्न करावं, पण डोक्यात हा विचार चालू असतो की, याच्याशी आपलं लग्न होऊ शकतं, तर त्या व्यक्तीसाठी मी माझा वेळ आणि एनर्जी खर्च करू शकते. मला टाईमपास करण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. माझं एवढंच म्हणणं आहे की, जर लग्न होणार नसेल, तर तिथेच थांबावं. यावर माझ्या आई- वडिलांचे असे म्हणणे आहे की, तू लग्न कर, कोणाशीही कर पण लग्न कर. त्यांना या गोष्टीची काळजी आहे की, मी लग्न करेल की नाही?”

तापसी पन्नू या दिवसात बॅडमिंटन प्लेअर मॅथीयास बो याला डेट करत आहे. ती त्याच्यासोबत अनेकवेळा व्हेकेशनवर जात असते. काही दिवसांपूर्वी ते दोघे मालदीवला‌‌ गेले होते. परंतु ती सोशल मीडियावर याबाबत काहीच माहिती देत नाही.

काही दिवसांपूर्वी जेव्हा तापसीच्या घरावर इन्कम टॅक्सची रेड पडली होती, तेव्हा तिच्या बॉयफ्रेंडने तिला खूप सपोर्ट केला होता.

तिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती नुकतीच ‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात तिच्यासोबत विक्रांत मेस्सी आणि हर्षवर्धन राणे हे देखील होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नसीरुद्दीन शाह यांना ८ दिवसांनी मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, मुलाने फोटो शेअर करत दिली माहिती

-कियारासाठी वयस्कर व्यक्तीने गाडीचा दरवाजा उघडत ठोकला सलाम; नेटकरी म्हणाले, ‘तुझ्या वडिलांपेक्षा जास्त…’

-अजय देवगणच्या ओटीटी पदार्पणासोबतच कमबॅक करणार ‘ही’ अभिनेत्री; कित्येक वर्षांपासून आहे मोठ्या पडद्यापासून दूर

हे देखील वाचा