Sunday, March 23, 2025
Home बॉलीवूड Tapasee Pannu Wedding | ‘मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत स्पष्टीकरण देणार नाही’, तापसी पन्नूच्या विधानाने नेटकरी संभ्रमात

Tapasee Pannu Wedding | ‘मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत स्पष्टीकरण देणार नाही’, तापसी पन्नूच्या विधानाने नेटकरी संभ्रमात

Tapasee Pannu Wedding | अभिनेत्री तापसी पन्नू (Tapasee Pannu Wedding) अखेरची राजकुमार हिरानी दिग्दर्शित डंकी’ या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकताना दिसली होती. या चित्रपटात अभिनेत्री बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली होती. आगामी काळात तापसी अनेक प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे. परंतु ती सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काल अशी बातमी आली होती की अभिनेत्री तिचा दीर्घकालीन बॉयफ्रेंड मॅथियास बो याच्याशी लग्न करणार आहे. त्याचवेळी, त्यांच्या लग्नाचे ठिकाण आणि लग्नाच्या तारखेबाबतचे अनेक रिपोर्ट्सही व्हायरल झाले होते. आता स्वत: तापसीने या बातम्यांवर मौन तोडले असून मोठा खुलासा केला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तापसी पन्नू आणि मॅथियास बो मार्च महिन्यात उदयपूरमध्ये एकमेकांशी लग्न करणार आहेत. शीख आणि ख्रिश्चन दोघेही प्रथा आणि परंपरेनुसार लग्न करणार आहेत. अभिनेत्रीच्या लग्नाबाबत अफवांचा बाजार उठला आहे. दरम्यान, तापसीलाही तिच्या लग्नाबद्दल प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. मात्र, तिने यावर भाष्य करण्यास साफ नकार दिला.

तापसी पन्नूने सांगितले की, तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कधीही स्पष्टीकरण दिलेले नाही आणि भविष्यातही देणार नाही. एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत मी कधीही कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही आणि कधीच देणार नाही.’ मंगळवार, 27 फेब्रुवारी रोजी एका मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की तापसी आणि मथियास मार्च महिन्यात एका खाजगी विवाह सोहळ्यात कायमचे एकत्र राहणार आहेत.

माध्यमातील लग्नात फक्त तिचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत आणि बॉलीवूड ए-लिस्टर स्टारला आमंत्रित केले जाणार नाही. तापसी आणि मथियास अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत, परंतु दोघांनीही याबद्दल फारच कमी माहिती शेअर केली आहे. दोघांनाही आपलं वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवायला आवडतं.

तापसीने अलीकडेच मॅथियाससोबतच्या तिच्या नात्याबद्दल उघडपणे सांगितले. तिने एका पॉडकास्टमध्ये सांगितले की, ‘मी 13 वर्षांपूर्वी अभिनय करायला सुरुवात केली आणि त्याच वर्षी मी बोईला भेटले. त्याला सोडण्याचा किंवा दुसऱ्यासोबत राहण्याचा कोणताही विचार माझ्या मनात नाही कारण मी या नात्यात खूप आनंदी आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Shahrukh Khan And Gauri Khan Lovestory | …म्हणून एका दिवसात शाहरुख आणि गौरीने केले होते 3 वेळा लग्न, झाला मोठा खुलासा
Drudhyam Remake | हॉलिवूडमध्ये थैमान घालण्यासाठी अजय देवगणचा ‘दृश्यम’ सज्ज, इंग्रजीसह ‘या’ भाषांमध्ये बनणार रिमेक

हे देखील वाचा