Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘तारक मेहता…’मधील जुनी ‘सोनू’ निधीला दिसले जंगलाच्या मधोमध तलाव; मग काय करू लागली स्विमिंग

टेलिव्हिजनवरील ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेने गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या मालिकेचे यश म्हणजे मालिकेतील पात्र. प्रत्येक पात्राची एक वेगळी खासियत आहे. प्रत्येकजण आपल्या दिलखुलास विनोदी शैलीने सर्वांना हसावण्यासाठी सज्ज झालेले असतात. यातील सोनू हे पात्र निभावलेली अभिनेत्री निधी भानुशाली ही सध्या तिचा अभ्यास आणि वैयक्तिक आयुष्य एन्जॉय करत आहे. भलेही निधी आणि अभिनय क्षेत्रापासून लांब आहे, पण तिच्या वैयक्तिक आयुष्याचे दर्शन ती सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांना देत असते. नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे जो तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, निधी जंगलाच्या मध्ये एका तलावात स्विमिंग करताना दिसत आहे. सुरुवातीला फक्त तो तलाव दिसतो, पण नंतर ती त्या तलावात पोहताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “जंगलाच्या मधोमध खूप आनंद आहे.”

निधीचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. या व्हिडिओवर आतापर्यंत 500 पेक्षा ही अधिक कमेंट्स आल्या आहेत. तसेच लाखो लोकांनी हा व्हिडिओ पहिला आहे. निधी इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे. ती तिच्या गाण्यापासून ते डान्सपर्यंत सगळे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

निधीने ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेत आत्माराम भिडे आणि माधवीची मुलगी सोनूचे पात्र निभावले होते. तिने जवळपास 6 वर्ष या मालिकेत काम केले. त्यानंतर तिच्या अभ्यासासाठी तिने ही मालिका सोडून दिली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा