Friday, June 13, 2025
Home अन्य बादशाहच्या ‘जुगनू’ गाण्यावर बबिता जीने धरला ठेका, चाहते म्हणाले ‘आज जेठालाल…’

बादशाहच्या ‘जुगनू’ गाण्यावर बबिता जीने धरला ठेका, चाहते म्हणाले ‘आज जेठालाल…’

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची बबिता जी म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता हिला कोण ओळखत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून तिने या शोमध्ये केवळ जेठालालच नाही, तर चाहत्यांच्या मनावरही या व्यक्तिरेखेने राज्य केले आहे. मुनमुन दत्ता सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते, जे तिच्या चाहत्यांनाही खूप आवडतात. अलीकडेच, तिने एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. जो पाहिल्यानंतर चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

मुनमुन दत्ताने केला जबरदस्त डान्स
मुनमुनने यापूर्वी आपला अप्रतिम अवतार चाहत्यांसमोर सादर केला होता. गेल्या ४ महिन्यांत, तिने एक अद्भुत ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. तिचा स्लिम अवतार चाहत्यांना आवडला होता. आता अलीकडेच तिने एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती सिंगर बादशाहच्या ‘जुगनू’ गाण्यावर जबरदस्त कंबर हलवताना दिसत आहे.

बबिताजीला चढला ‘जुगनू फिव्हर’
व्हिडिओमध्ये तिने शॉट्स परिधान केले आहे. मुनमुन ‘जुगनू’ची हुक स्टेप अगदी सहज आणि स्टाईलने करत आहे. हा व्हिडिओ शेअर करत लिहिले, “जुगनू फिव्हर.”
तिच्या या व्हिडिओला ३ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

काय म्हणाले सोशल मीडिया युजर्स
बबिता जीचा हा व्हिडिओ पाहून तिचे चाहते कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. एका युजरने लिहिले की, “स्लिम होऊन अधिक सुंदर आली आहे.” दुसऱ्याने लिहिले की, “लुकडी-सुकडी बबिता जी.” एका युजरने लिहिले की, “ओ… आग.” त्याचवेळी काही युजर्सनी यावेळी जेठालालची आठवण काढली. एका युजरने लिहिले की, “आज हे पाहून जेठालालला झोप येणार नाही.”

१३ वर्षांपासून आहे तारक मेहताचा भाग
मुनमुन दत्ता २००८ पासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये बबिता अय्यरची भूमिका साकारत आहे. याआधी ती २००४ मध्ये टीव्ही सीरियल ‘हम सब बाराती’मध्ये दिसली होती. ही अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या पोस्ट्सद्वारे तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करत असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शोएब- दीपिकाच्या कुटुंबातील ‘या’ सदस्याने गमावले प्राण, लाडक्याच्या जाण्याने अभिनेत्रीला अश्रू अनावर

-जेव्हा आपला चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहात पोहचल्या साधना; दिसले ‘असे’ काही की, मैत्रिणींसमोरच कोसळले रडू

-खरंच की काय! तिसरं लग्न करायला आमिर खान झालाय सज्ज? ‘या’ अभिनेत्रीसोबत रंगलीय लग्नाची चर्चा

हे देखील वाचा