Thursday, January 15, 2026
Home टेलिव्हिजन ‘तारक मेहता…’ फेम अभिनेत्रीने मुंबईत येऊन केला नकारांचा सामना; मित्रांकडून उधारीने पैसे घेऊन भरलं पोट

‘तारक मेहता…’ फेम अभिनेत्रीने मुंबईत येऊन केला नकारांचा सामना; मित्रांकडून उधारीने पैसे घेऊन भरलं पोट

अभिनेत्री पलक सिधवानी हिने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत साेनूची भूमिका साकारून आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. पलक ही मूळची मध्यप्रदेशातील मनसा येथील आहे. पलक सिधवानी 2016 मध्ये अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न घेऊन मायानगरीत आली होती. मुंबईत आल्यावर तिचा प्रवास कसा हाेता, हे तिने एका मुलाखतीत सांगितलं. 

एका मुलाखतीदरम्यान पलक सिधवानी (Palak Sindhwani) हिने तिच्या प्रवासाविषयी खुलासा करत म्हणाली, “मी 2016 मध्ये मुंबईत आली. माझा खर्च भागवण्यासाठी मी काही काम करत हाेती. ते काम करण्यासाठी निश्चित वेळ नसल्याने मी कास्टिंगचे काम करत हाेती, तेव्हा काही लोकांनी सुचवले की, मी कॅमेरामध्ये चांगली दिसते आणि त्यासाठी मी ऑडिशन द्यायला पाहिजे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Palak Sindhwani (@palaksindhwani)

पलकने पुढे सांगितले की, “मी माझ्या कारकिर्दीत अनेक नकारांचा सामना केला, परंतु यामुळे मी कधीच हार मानली नाही. मी जाहिरातीमध्ये काम केले आणि काही दिवसातच मला ‘तारक मेहता’च्या टीमचा फोन आला आणि अशाप्रकारे 2019मध्ये मला माझा पहिला शो मिळाला.”

पलक म्हणाली, “जेव्हा मी मुंबईत आले, तेव्हा मला वाटायचे की, या शहरात मी कशी टिकेल? मला आठवतं मी पहिल्यांदा मुंबईत आले, तेव्हा मी रेल्वे स्टेशनवर एका पुलावर उभी होती. तिकडे मी वेगाने धावणाऱ्या ट्रेन्स आणि माणसं पाहत होती. या शहरात लोक कसे राहतात हा विचार मी करत हाेती. मी ज्या ठिकाणाहून आले हाेते, तेथील आयुष्य फारच सावकाश हाेते.”

पलक पुढे म्हणाली, “सुरुवातीला मी घाबरले हाेती, पण भावाने समजावले की, तू धीर धर हळूहळू सर्व शिकून जाशील.” पलक हिने जुन्या दिवसांची आठवण काढत सांगितले की, “मुंबईला आल्यानंतर सुरुवातीला माझ्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे मित्रांकडून पैसे घेऊन मी उदरनिर्वाह करत हाेते. त्यावेळी अनेक आर्थिक अडचणी हाेत्या, पण मी हार मानली नाही याचा मला आनंद आहे. त्यावेळी मला मित्रांकडून पैसे घ्यावे लागले, पण चांगली बाब म्हणजे मी अजूनही त्यांच्या संपर्कात आहे. मी आयुष्यात अशाप्रकारे पुढे जात असल्याचा त्यांना खूप अभिमान आहे. मी खूप मेहनत घेतली. मात्र, त्याचे फळ देखील मला मिळाले. मुंबईने मला मजबूत बनवले.”

पलक सिधवानी साेशल मीडियावर खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिचे 1.4 मिलियन फॉलोव्हर्स आहेत. ती नेहमी तिचे फाेटाे आणि व्हिडिओ साेशल मीडियावर चाहत्यांसाेबत शेअर करत असते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘नेहा कक्करला 8 वर्षांसाठी तुरुंगात डांबा’, गायिका का होतेय ट्रोल? कारण घ्या जाणून
पत्रकार विचारत होता प्रश्न, तेवढ्यात अचानक रागाने ओरडला सनी देओल; उपस्थितांमध्ये पसरली भयान शांतता
‘माझ्या गाडीचा ब्रेक फेल केला, विष देऊन मारण्याचाही प्रयत्न झाला…’ अभिनेत्री तनुश्री दत्ताचा खळबळजनक खुलासा

हे देखील वाचा