Wednesday, July 3, 2024

अखेर अप्रत्यक्षरीत्या का होईना शैलेश लोढा यांनी सांगितले ‘तारक मेहता…’ सोडण्याचे खरे कारण

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधला सर्वात लोकप्रिय, प्रसिद्ध आणि टॉपचा शो म्हणून तारक मेहता का उलटा चश्मा हा शो ओळखला जातो. या शोने मोठे यश मिळवत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. मात्र सर्व सुरळीत चालू असताना अचानक या शोमधील कलाकार एकामागोमाग एक शो सोडू लागले आणि शो अचानक चर्चेत आला. शोमधील लहान मोठ्या अनेक कलाकारांनी हा शो सोडला आणि शोबद्दल अनेक बातम्या येऊ लागल्या या शो सोडणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेते शैलेश लोढा देखील होते. त्यांनी या शोमध्ये तारक मेहता ही भूमिका साकारली होती.

शैलेश लोढा यांनी या शोमुळे मोठी लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. त्यांनी ही मालिका सोडली ही बातमीच लोकांच्या पचनी पडत नव्हती मात्र अखेर ही बातमी खरी ठरली आणि त्यांच्या जागी नवीन कलाकार आला. मात्र शैलेश लोढा यांनी ही मालिका का सोडली हा परष अनुत्तरीतच राहिला होता. आता मात्र त्यानी याचा खुलासा केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shailesh Lodha (@iamshaileshlodha)

शैलेश लोढा यांना प्रेक्षक खूपच मिस करत होते. नुकतेच एका कार्यक्रमात त्यांनी या विषयावर भाष्य केले. शैलेश यांनी निर्माते असित मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, “कोणताही प्रोड्युसर हा अभिनेत्यापेक्षा मोठा पासूनच शकत नाही.ते एक व्यापारी आहे. जेव्हा कोणी व्यापारी, माझ्या कवी होण्यावर, अभिनेता होण्यावर हवी होणार तेव्हा तेव्हा ज्वालामुखी फुटणार.”

याआधी प्रोड्युसर असित मोदी यांनी शैलेश लोढा यांचे पैसे न देण्यावर एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की, “जे काही बोलले जात आहे, की आम्ही पैसे दिले नाही यात काहीच तथ्य नाही. मी कोणाच्या मेहनतीचे पैसे खिशात ठेऊन कुठे जाणार? देवाने मला खूप काही दिले आहे. असे अजिबातच नाही की मी लोकांचे पैसे दिले नाही. मला आनंद आहे की, मी लोकांना हसवतो आणि या कामामुळे मला स्वतःवर गर्व जाणवतो.”

तत्पूर्वी शैलेश लोढा यांनी त्यांच्या अभिनयाद्वारे मोठी बक्कळ कमाई केली आहे. पेशाने एक वकील असून ते वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जाताना देखील मोठी रक्कम घेतात. माहितीनुसार ते पैशाच्या कारणासाठी शोमधून बाहेर आले आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टमधे मित्राला सपोर्ट करण्यासाठी पोहचली ‘मंडळी’, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

धक्कादायक! ए.आर. रहमान यांचा मुलगा अमीन याच्यासोबत मोठा अपघात; 3 दिवसानंतरही गायक शॉकमध्ये

हे देखील वाचा