टीव्ही जगतातील काही मालिका या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. टेलिव्हिजनवर काम करणाऱ्या कलाकरांना या मालिकांनी अमाप लोकप्रियता मिळवून दिली आहे. आजच्या घडीला टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध मालिका म्हणजे सोनी सब चॅनेल वरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. या मालिकेने सर्व कलाकरांना संपूर्ण जगात एक ओळख मिळवून दिली. मालिकेतील एक एक पात्र प्रेक्षकांच्या परिचयाचे झाले आहे. याच मालिकेतील अतिशय सुंदर पात्र म्हणजे ‘बबिता जी’.
जेठालालला भुरळ घालणारी बबिता जी या मालिकेतील महत्वाचे पात्र आहे. बबिताजी म्हणजेच मुनमुन दत्ता सध्या तिच्या मालिकेव्यतिरिक्त एका गोष्टीमुळे खूप चर्चेत आली आहे. एका जातीवर आपत्तीजनक विधान केल्यामुळे मुनमुनवर तक्रार दाखल करण्यात आली आहे. एससी-एसटी अधिनियमाच्या अंतर्गत तिच्यावर केस करण्यात आली आहे. सध्या केसमध्ये कोर्टाने स्थगिती आणली आहे. या सोबतच ती अजून एका गोष्टीमुळे चर्चेत आहे आणि ती गोष्ट म्हणजे, पुरुषांवर असणारा तिचा राग.
साल २००८ मध्ये मुनमुन आणि अभिनेता अरमान कोहली नात्यात होते. मात्र काही कालावधीनंतर त्यांचे नाते संपुष्टात आले. याचे करण म्हणजे अरमानचा रागीट स्वभाव. माध्यमातील वृत्तानुसार मुनमुन आणि अरमान नात्यात असताना, वेलेंटाइन्स डे च्या दिवशी अरमानने मुनमुनला मारहाण केली होती. ही गोष्ट तर जगजाहीर आहे. यानंतर मुनमुनने अरमान विरोधात तक्रार देखील नोंदवली होती. त्यानंतर अरमानला त्याचा चुकीच्या वर्तवणुकीसाठी दंड भरावा लागला होता.
मुनमुन तिच्या स्पष्टवक्ता स्वभावाने देखील ओळखली जाते. एकदा मुनमुनने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “जगात प्रत्येक मुलीला यौन शोषणाचा सामना एकदा तरी करावाच लागतो. मी माझ्या घराजवळ राहणाऱ्या एका काकांना खूप घाबरायची. जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते मला पकडायचे आणि कोणाला न सांगण्यासाठी धमकी देखील द्यायचे. मी १३ वर्षांची असताना माझ्या ट्युशन टीचरने माझ्या अंडरगारमेंट्समध्ये हात टाकला होता. मला समजत नव्हते की, मी हे घरी कसे सांगू. तेव्हापासूनच मला पुरुषांबद्दल एक घृणा निर्माण झाली. (taarak mehta ka ooltah chashmah fem munmun dutta talk about metoo and ex boyfriend)
बंगालमध्ये जन्मलेल्या मुनमुनने २००४ साली झी टीव्हीच्या ‘हम सब बाराती’ मालिकेतून अभिनयात पदार्पण केले. तर २००५ साली कमल हसनसोबत ‘मुंबई एक्सप्रेस’ या सिनेमातून चित्रपटात पदार्पण केले. २००८ साली तिला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत बबिता अय्यर ही भूमिका मिळाली आणि तिचे संपूर्ण जीवन बदलले.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा – दाक्षिणात्य सिनेसृष्टी शोकसागरात! अभिनेता महेश बाबूच्या आईचे दुखःद निधन
लता मंगेशकर यांच्यासाठी ‘हे’ गाणे होते खूपच कठीण, मात्र एसपी बालसुब्रमण्यम यांच्या मदतीमुळे गाणे झाले सुकर
लता मंगेशकर यांनी थेट ‘सीआयडी’मधील एसीपी प्रद्युमनवर रोखली होती बंदूक, वाचा रंजक किस्सा