Thursday, November 30, 2023

दाक्षिणात्य सिनेसृष्टी शोकसागरात! अभिनेता महेश बाबूच्या आईचे दुखःद निधन

सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) यांची आई आणि अभिनेत्री इंदिरा देवी यांचे निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही आठवड्यांपासून सुपरस्टारच्या आईची तब्येत खराब होती. त्यांच्यावर हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना काही काळ व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते, मात्र आज पहाटे ४ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हे वर्ष महेश बाबूसाठी दुःखाचा डोंगर घेऊन आले आहे. पहिल्या वर्षाच्या सुरुवातीला त्याचा भाऊ रमेश बाबू गमावला आणि आता अभिनेत्याच्या आईचे दुखःद निधन झाले आहेय अधिकृत माहितीनुसार, इंदिरा देवी यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत पद्मालय स्टुडिओत आणले जाईल. यानंतर ज्युबिली हिल्स येथील महाप्रस्थानम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

महेश बाबू यांच्या कुटुंबीयांकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनानुसार, “ज्येष्ठ अभिनेते कृष्णा यांच्या पत्नी आणि महेश बाबू यांच्या आई घटामनेनी इंदिरा देवी यांचे काही वेळापूर्वी निधन झाले. त्या बऱ्याच दिवसांपासून आजाराने त्रस्त होती. आज सकाळी ९ वाजता त्यांचे पार्थिव पद्मालय स्टुडिओ येथे चाहत्यांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून महाप्रस्थानम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा – लता मंगेशकर यांच्यासाठी ‘हे’ गाणे होते खूपच कठीण, मात्र एसपी बालसुब्रमण्यम यांच्या मदतीमुळे गाणे झाले सुकर
…म्हणून लता मंगेशकर अविवाहित असूनही लावत होत्या कुंकू, गानकोकीळेच्या आयुष्यातील ‘त्या’ घटनेचा झाला खुलासा
रणबीर कपूरला मिळाली होती ‘स्टार वॉर्स’मध्ये काम करण्याची संधी, पण ह्या एका भितीने केला घात

हे देखील वाचा