‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या शोचे फॅन नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. प्रतयेक घरात हा शो पाहिला जातो. या शोला आणि शो मधील कलाकारांना प्रेक्षकांनी त्यांच्या घरासोबतच मनात देखील स्थान दिले आहे. आज हा शो टॉपला असून, वेगवेगळ्या ट्विस्ट आणि कथांमुळे सतत चर्चेत असतो. मात्र मागील काही काळापासून या शोला अनेक मोठ्या कलाकारांनी रामराम ठोकल्यामुळे शो चर्चेत आला होता. अनेक जुन्या मोठ्या कलाकारांनी शो सोडला आणि त्यानंतर निर्मात्यांवर विविध आरोप केले. शो सोडल्यामुळे अनेक कलाकारांच्या जागी नवीन कलाकार आले आणि शो पुढे जाऊ लागला. मात्र असे असले तरी अजूनही कलाकार जुन्या लोकांना विसरलेला नाही. या शोची सर्वात मोठी कलाकार म्हणजे अभिनेत्री दिशा वाकानी. दिशा या शोमध्ये दया भाभी ही भूमिका साकारते. मात्र मागील काही वर्षांपासून दया शो मध्ये दिसत नाही. अनेकदा फॅन्सकडून दयाला पुन्हा शोमध्ये आणण्याची मागणी केली गेली. निर्मात्यानी देखील प्रयत्न चालू असल्याचे सांगितले होते.
मात्र आता दयाची आठवण तिच्या नवऱ्याला जेठालालला देखील येत आहे. हे खुद्द दिलीप जोशींनीच सांगितले. शोमध्ये एका नवीन टप्पूची एन्ट्री झाली असल्यामुळे आता शोमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज अनादटला रिप्लेस करून अभिनेता नितीश भलूनी आता टप्पू ही भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकतीच शोमध्ये नव्या टप्पूची एन्ट्री झाली आहे. यानिमित्ताने नितीशचा मीडियाशी परिचय करून देण्यात आला. या प्रेस कॉन्फरन्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात दिलीप जोशी यांनी कबूल केले की ते त्यांची रील पत्नी दया बेन अर्थात दिशा वाकानीला मिस करत आहे.
यामध्ये पत्रकारांनी दिलीप जोशी यांना विचारले की, “दयाबेन शोमध्ये पुन्हा कधी येणार?” यावर उत्तर देताना दिलीप जोशी म्हणाले, “हे तर तुम्ही निर्मात्यांना विचार. तेच सांगू शकतील की कोण्या नव्याला रिप्लेस करायचे की नाही. मला एक अभिनेता म्हणून दयाची आठवण येते. मोठ्या कालावधीपासून तुम्ही देखील दया आणि जेठा यांच्या मजेशीर केमिस्ट्रीचा आनंद घेतला नाही. जेव्हापासून दया गेली तेव्हापासून तो भाग, तो अँगल आणि तो फनी भाग गायब झाला आहे. मला माहित आहे की लोकं देखील या गोष्टींना मिस करत असतील. आता पाहू पुढे काय होते. मी आणि आमचे निर्माता नेहमीच सकारात्मक असतो. तुम्हाला देखील नाही माहित उद्या काय होईल ते.”
तत्पूर्वी तारक मेहता का उलटा चश्मा हा शो मागील १५ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्याचमुळे प्रेक्षकांची शोसोबत आणि शोमधील कलाकारांसोबत एक वेगळीच नाळ जुळली गेली आहे. शोमधील सर्वांची लाडकी दया बेन २०१७ पासून शोमध्ये नाही. मात्र मधेमधे तिला शोमध्ये वेगवगेळ्या पद्धतीने दाखवण्यात आले होते. आता पूर्णपणे दयाबेन शोमध्ये कधी दिसणार हे लवकरच समजेल.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आता सुट्टी नाही! 21 दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’चाच डंका, कमाईचा आकडा उडवेल तुमचीही झोप
स्मिता पाटील यांचा मुलगा प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात, टॅटू दाखवत केला नात्याचा खुलासा; पाहा फोटो