तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेने लोकप्रियतेमध्ये नेहमीच आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. १२ वर्षांपासून जास्त काळ या मालिकेने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. त्यामुळेच या मालिकेतील प्रत्येक भूमिकेशी प्रेक्षकांचे एक खास नाते आहे. मालिकेतील जेठालालची भूमिका असो किंवा, बबिताजींची भूमिका असो प्रेक्षकांनी मालिकेतील प्रत्येक कलाकाराला भरभरुन प्रेम दिले आहे. परंतु अलिकडच्या काळात मालिकेत घडणाऱ्या त्याच त्याच कथा, आणि अनेक कलाकारांनीही कार्यक्रमाला ठोकलेला राम राम यामुळे या लोकप्रिय मालिकेकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. काय आहेत या मालिकेची लोकप्रियता घटण्याची प्रमुख कारणे चला जाणून घेऊ.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये पोपटलालचे कधी लग्न करणार का? दयाबेन शोमध्ये परतणार का? हे प्रश्न वर्षानुवर्षे विचारले जात आहेत. हे सर्व लवकरच होईल,असा दिलासा प्रत्येक वेळी दिला जात असला तरी प्रत्येक वेळी चाहत्यांच्या पदरी निराशाच पडते. त्यामुळेच आता चाहत्यांच्या संयमाचा आणि प्रतिक्षेचा बांध फुटू लागला आहे. प्रेक्षकांनी या मालिकेबद्दल आपली नाराजी व्यक्त करायला सुरूवात केली आहे. कथेत यावेळी पोपटलालचे लग्न होणार असे सर्वांना वाटत होते. मुली आणि मुलींनी आधीच हो म्हटलं होतं. आहेरही आले होते, मुक्कामाची तयारीही झाली होती, पण शेवटच्या क्षणी तेच पुन्हा घडले, जे ते वर्षानुवर्ष दाखवत आले आहेत. आता पोपटलाल खरंच लग्न करणार आणि मग दयाबेनही शोमध्ये परतणार असं सगळ्यांना वाटत होतं.
पोपटलालचे लग्न होत नसताना, शोमध्ये दयाबेनची एंट्री न झाल्याने चाहतेही निराश झाले आहेत. प्रत्येक वेळी असे म्हटले जाते की लवकरच दयाबेनची भूमिका शोमध्ये दाखवली जातील पण तसे होत नाही. आता पुन्हा एकदा ही मागणी समोर आल्यानंतर शोचे निर्माते असित मोदी यांनी दयाबेनच्या पुनरागमनाची तयारी केल्याचे स्पष्ट केले. ज्यासाठी एक चांगली कथा लिहिली गेली आहे, त्यामुळे ती लवकरच परतणार आहे, परंतु या घोषणेनंतर दोन दिवसांनी दिशा वाकानी पुन्हा आई झाल्याची बातमी आली. अशा परिस्थितीत दिशा सध्या शोमध्ये परतणार नाही, अशी शक्यता आहे. त्यामुळे चाहत्यांची निराशा झाली आहे. या दोन्ही गोष्टी लवकरच या शोमध्ये व्हाव्यात, जेणेकरून काही नवीनता दिसावी अशी प्रेक्षकांची इच्छा आहे.
- हेही वाचा-
- Birth Anniversary : कोरोना काळात गमावलेला जादूई आवाज,एसपी बालसुब्रमण्यम यांच्या नावावर होता ‘हा’ विश्वविक्रम
- करण कुंद्राची एक्स गर्लफ्रेंड अनुषा दांडेकर लग्नाशिवाय झाली आई, बाळाचे फोटो शेअर करत दिली माहिती
- अभिनेते अशोक सराफ वाढदिवस| हटाई अशी झाली की ब्लॅंकेटमध्ये तोंड लपवून केला होता कोल्हापूरपर्यंतचा प्रवास