टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात चर्चित शो म्हणून ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या शोने मागील १३ वर्षांपेक्षा जास्त काळापासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले अजूनही करत आहे. हलक्या फुलक्या छोट्या छोट्या कहाण्यांमधून प्रेक्षकांना हसवणारा हा शो खऱ्या अर्थाने गाजला. आजही या शो लोकांचा आवडता शो आहे. शोमध्ये या १३ वर्षांमध्ये अनेक बदल झाले. नवीन कलाकार आले, जुने गेले शो चे स्वरूप काही अंशी बदलले. मात्र त्यांचा प्रेक्षकांना हसवण्याचा उद्देश काही बदलला नाही. मागील काही वर्षांपासून शोची आन बान शान असलेल्या दया बेन गायब आहे. इतर कलाकारही गायब होते, मात्र त्यांना पुन्हा दुसऱ्या कलाकारांसोबत रिप्लेस करून नवीन कलाकार आले. मात्र शोमध्ये बाघाची बावरी देखील गायब होती. मात्र आता शोमध्ये पुन्हा एकदा बावरीची एन्ट्री होत आहे.
View this post on Instagram
फॅन्सच्या जोरदार मागणीला प्रतिसाद देत आणि टीआरपीला बढावा देण्यासाठी निर्मात्यांनी पुन्हा एकदा बावरीला मालिकेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मालिकेमध्ये बावरी पुन्हा येणार असल्याचे संकेत दिले जात आहे. मात्र आता बावरी ही भूमिका कोण निभावणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र आता याचे गुपित उघड झाले असून, नवीन बावरीची भूमिका अभिनेत्री नविना वाडेकर साकारताना दिसणार आहे. या मालिकेच्या सेटवरून आता नवीन बावरी आणि बाघा यांचे फोटो व्हायरल होत आहे.
या मालिकेच्या निर्मात्यांनी नवीन बावरीच्या निवडीवरून सांगितले की, ” आम्हाला एक नवीन आणि निरागस चेहरा पाहिजे होता. असा चेहरा अखेर आम्हाला मिळाला. नवीनने आम्हाला वाचन दिले आहे की ती आमच्यासोबत प्रतिबद्ध असेल. आमच्या शोला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आले आहे, आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करणे आमची जबादारी आहे. आम्हाला विश्वास आहे की, बावरी म्हणून प्रेक्षकांना नाविना वाडेकर नक्कीच आवडेल. आम्ही अनेक अभिनेत्रींचे ऑडिशन घेतले. मात्र आम्हाला तीच जास्त आवडली.” आता लवकरच मालिकेत देखील बावरी पाहायला मिळणार.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
प्रसिद्ध हॉलिवूड गायिका लिसा प्रेस्ली यांचे वयाच्या अवघ्या ५४ व्या वर्षी निधन
‘तू लगावे जब लिपिस्टिक’ गाण्यावरील किली पॉलच्या व्हिडीओपुढे नेटकऱ्यांना पवनसिंग देखील वाटला फेल