Friday, August 1, 2025
Home अन्य TMKOC: निसर्गाच्या सानिध्यात हरवलीय ‘सोनू’, समुद्रकिनारी दाखवली ग्लॅमरस स्टाईल

TMKOC: निसर्गाच्या सानिध्यात हरवलीय ‘सोनू’, समुद्रकिनारी दाखवली ग्लॅमरस स्टाईल

टेलिव्हिजनचा लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या १३ वर्षांपासून सातत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अशा परिस्थितीत शोमधील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे. शोचे कलाकार त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही खूप चर्चेत असतात. आता यावेळी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेत्री निधी भानुशाली (Nidhi Bhanushali) चर्चेत आहे. भलेही निधी सध्या या शोचा भाग नाही, परंतु तिच्या फॅन फॉलोविंगमध्ये कोणतीही घट झालेली नाही. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

नुकतेच निधीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिची ग्लॅमरस स्टाईल पाहायला मिळत आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये निधीने जांभळ्या रंगाचा क्रॉप टॉप परिधान केला आहे. निधीची ही वेगळी आणि नवीन स्टाईल चाहत्यांना आवडत आहे. फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शन लिहिले की, “समुद्री वाऱ्याला फिल करत, तू मला राहू देणार नाहीस!” (taarak mehta ka ooltah chashmah sonu aka nidhi bhanushali new pictures)

निधी भानुशालीचे सुंदर फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. चाहते तिच्या फोटोंवर उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत. निधी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये सोनूची भूमिका साकारत होती, ज्यामध्ये तिला चाहत्यांनी खूप पसंत केले होते.

गोलीसोबतचा फोटो केला होता शेअर
शनिवारी (४ डिसेंबर) निधीने शोमध्ये गोलीची भूमिका करणाऱ्या कुश शाहसोबतचे फोटो शेअर केले. कमेंट सेक्शनमध्ये युजर्सने “गोली बेटा मस्ती नही” अशा मजेदार प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. निधी दीर्घकाळापासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’सोबत जोडली गेली आहे. या शोमध्ये ती मिस्टर आणि मिसेस भिडे यांची मुलगी सोनूची भूमिका साकारत होती.

 

‘तारक मेहता…’ टीम पोहोचणार केबीसीमध्ये
गोकुळधामच्या टप्पू सेनामध्ये असणारी ती एकमेव मुलगी होती. लवकरच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची संपूर्ण टीम अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोमध्ये दिसणार आहे. या शोचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये अमिताभ बच्चन अभिनेते दिलीप जोशीसोबत मस्ती करताना दिसत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा