Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

TMKOC: समुद्रकिनारी ‘ब्रालेस’ अंदाजात दिसली ‘सोनू’, बोल्ड स्टाईल लावतेय सोशल मीडियावर आग!

तब्बल १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा दीर्घकाळ चालणारा शो बनला. यामध्ये काही कलाकार असे आहेत, ज्यांना प्रेक्षकांनी लहानाचे मोठे होताना पाहिले आहे. एकेकाळी शोचे बालकलाकार असलेले हे कलाकार, आता तरुण होऊनही चाहत्यांची मने जिंकत आहेत. या शोचा एक भाग राहिलेली अभिनेत्री निधी भानुशाली (Nidhi Bhanushali) म्हणजेच जुन्या ‘सोनू’ला सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे खूप प्रेम मिळते. आता निधी भानुशालीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर अक्षरशः आग लावत आहे.

ब्रालेस अंदाज झाला व्हायरल
निधी भानुशालीने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती फुलऑन संडेच्या मूडमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये निधी समुद्र किनाऱ्यावर चालत असून तिच्या चाहत्यांना सुंदर लाटांचे दृश्य दाखवत आहे. यासोबत, तिने कॅमेरा तिच्या दिशेने वळवला ज्यामध्ये ती स्ट्रॅप्ड टॉपमध्ये ब्रालेस दिसत आहे. (taarak mehtas sonu aka nidhi bhanushali was seen braless on the seashore)

चाहत्यांना भावला अंदाज
ही पहिलीच वेळ नाही, तर याआधीही निधीचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती तिच्या साहसी आयुष्यातील फोटोही चाहत्यांसोबत शेअर करते. आता निधीचा हा लेटेस्ट व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यातील तिचा अंदाज आणि स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे.

‘या’ दिवशी झाली होती सुरुवात
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ २८ जुलै २००८ रोजी सुरू झाला आणि आता १३ वर्षांहून अधिक काळ यशस्वीपणे चालू आहे. या वर्षाच्या सुरुवातीला या शोने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही प्रवेश केला होता. मात्र, दयाबेन उर्फ ​​दिशा वकानीच्या अनुपस्थितीमुळे हा शो काही दिवसांपासून चर्चेत आहे. दिशा वकानीला शेवटची दयाबेनच्या भूमिकेत दिसल्याला तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. २०१७ पासून ती शोपासून दूर आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा