लग्नाच्या वाढदिवशी अनुष्का शर्माने लिहिली खास पोस्ट; विराटही म्हणाला, ‘तू माझं आयुष्य आहेस.’


बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटर विराट कोहली यांनी (Virat Kohli) शनिवारी (११ डिसेंबर) त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा केला. त्यांनी दोघांनीही सोशल मीडियावर फोटो शेअर करून एकमेकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विरुष्काची (Virushka) जोडी त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते. त्यांचा रोमँटिक अंदाज तसेच मस्ती देखील चाहत्यांना खूप आवडते.

त्यांच्या लग्नाला ४ वर्ष पूर्ण झाल्याने, त्यांचे चाहते त्यांना सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत. अशातच त्या दोघांनी देखील खास अंदाजात एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून त्यांचे प्रेम व्यक्त केले आहे. (virushka congratulated each other on their wedding anniversary express love by sharing pictures on Instagram)

इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून अनुष्काने लिहिले आहे की, “देयर इज नो वे आउट, देयर इज नो शॉर्टकट होम. हे आपले आवडते गाणे आहे आणि तू याच शब्दाप्रमाने संपूर्ण आयुष्य जगला आहेस. हे शब्द प्रत्येक गोष्टीबाबत बरोबर आहेत. या जगात तुझ्यासारखा माणूस असणे ही बहादुरीची गोष्ट आहे. गरजेच्या वेळी मला प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुला ऐकण्याची गरज होती तेव्हा तू मन मोकळे केले. तू सगळ्यात सुरक्षित पुरुष आहे ज्याला मी ओळखते.”

तिने पुढे लिहिले की, “जसे मी आधीच सांगितले होते की, ते लोक खूप भाग्यवान आहेत जे तुला खरे ओळखतात. तुझ्या यशामागील आत्म्याला ओळखतात. प्रेम, इमानदारी, पारदर्शकता आणि इज्जत नेहमीच आपल्याला रस्ता दाखवतील अशी माझी प्रार्थना आहे. मी आशा करते की, आपण मस्ती करण्याची कधीही बंद करणार नाही.” तिच्या या पोस्टवर विराट कोहलीने लिहिले आहे की, “तू माझं आयुष्य आहेस.”

विराट आणि अनुष्काने ११ डिसेंबर २०१७ साली लग्न केले. त्या दोघांनी इटलीमध्ये त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न केले. त्यानंतर त्यांनी दिल्ली आणि मुंबईमध्ये रिसेप्शन ठेवले. यामध्ये अनेक बॉलिवूड कलाकार सामील झाले होते.

अनुष्का आणि विराटने या वर्षी ११ जानेवारी २०२१ रोजी एका मुलीला जन्म दिला आहे. त्यांनी तिचे नाव वामिका असे ठेवले आहे. त्यांनी अजूनही त्यांच्या मुलीचा चेहरा सोशल मीडियावर दाखवला नाही.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!