Wednesday, January 14, 2026
Home मराठी ‘बाकी सगळं सोडा, पैसे खाल्ले का नाही ह्यावर बोला’ संजय राऊतांवर अभिनेत्याने साधला निशाणा

‘बाकी सगळं सोडा, पैसे खाल्ले का नाही ह्यावर बोला’ संजय राऊतांवर अभिनेत्याने साधला निशाणा

महाराष्ट्राच्या राजकारणात काल (३१ जुलै) रोजी अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी ईडीने धाड टाकल्याच्या बातमीने चांगलीच खळबळ माजवली होती. दिवसभराच्या चौकशीनंतर खासदार संजय राऊत यांना इडीच्या कारवाईत अटक करण्यात आली. कथित पत्राचार घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई झाल्याची माहिती समोर आली आहे. संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईचे राज्यभरात पडसाद उमटलेले पाहायला मिळाले.याच संदर्भातील अभिनेता आरोह वेलणकरचे ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

आरोह वेलणकर (Aroh Welankar) हा मराठी मनोरंजन जगतातील लोकप्रिय अभिनेता आहे. बिग बॉस मराठी मधून त्याने लोकप्रियता मिळवली होती. आपल्या अभिनयाइतकाच तो सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. आपल्या सोशल मीडियावरुन तो राज्याच्या राजकारणावर अनेकदा जाहीरपणे आपले मत मांडताना  दिसत असतो. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाईनंतरही आरोह वेलणकरचे ट्विट माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे.

संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर त्यांनी माझ्यावर चुकीचा गुन्हा लावण्यात आला आहे. “ईडी मला अटक करणार आहे, आणि मी अटक व्हायला जाणार आहे. परंतु मरेन पण झुकणार नाही. जी काही कारवाई व्हायची ती होऊ द्या, माझी जनता माझ्या पाठीशी आहे, उध्दव ठाकरे माझ्या पाठीशी आहेत,” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती. यावरच आरोह वेलणकरने “बाकी सगळं सोडा हो, पैसे खाल्ले का नाही ह्यावर बोला, भ्रष्टाचार केला का नाही ह्यावर बोला.. काय?” असे खोचक ट्विट केले आहे.सध्या त्याचे हे ट्विट व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनीही विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

दरम्यान, अभिनेता आरोह वेलणकरने राज्याच्या राजकारणावर जाहीर मत व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही त्याने अशा प्रकारे ट्विट केले होते. आरोह वेलणकरच्या अभिनय कारकिर्दिबद्दल बोलायचे झाले तर त्याने रेगे, घंटा, फनरल, हॉस्टेल डेज अशा मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

हेही वाचा –

डॉक्टर बनायचे स्वप्न घेऊन मोठी झाली सुरवीन चावला, १६ व्या वर्षाने केला घात अन् वळाली चित्रपटात

‘त्या’ प्रसंगानंतर शूटवरून घरी आल्यावर ढसाढसा रडली होती मृणाल ठाकूर, ‘अशी’ केली बॉलिवूडमध्ये एंट्री

सॉफ्टवेअर इंजिनिअर, मिस इंडिया अन् आज बॉलिवूडची यशस्वी अभिनेत्री; वाचा तापसी पन्नूचा रोचक सिनेप्रवास

हे देखील वाचा