Sunday, May 19, 2024

संजय राऊतांचे जया बच्चन यांना समर्थन; म्हणाले, ‘केंद्र सरकार त्यांच्या कुटुंबावर राग काढत आहे.’

पनामा पेपर्स लीक प्रकरणात बच्चन कुटुंब ईडी रडारवर आले आहे. सोमवारी (२० डिसेंबर) रोजी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची सून ऐश्वर्या राय बच्चन हिची दिल्लीच्या ईडी कार्यालयात तब्बल ६ तास चौकशी करण्यत आली आहे. यावर खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत केंद्राचे मोदी सरकारवर भडास व्यक्त केला आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांनी याबाबत मोदी सरकारवर कठोर शब्दात टीका केली आहे. ऐश्वर्या राय हिची चौकशी केल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, “जया बच्चन यांच्याबाबत नाराजी आहे की, ती नाराजी केंद्र सरकार त्यांच्या कुटुंबावर काढत आहे.”

त्याने पुढे सांगितले की, “जया बच्चन या विरोधी पार्टीसोबत उभ्या आहेत आ णि त्यांची साथ देत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार त्यांच्यावर नाराज आहे. त्यामुळे त्यांनी बच्चन कुटुंबाला ईडीकडून नोटीस पाठवली. ऐश्वर्या नंतर तिच्या घरातील इतर काही सदस्यांना देखील नोटीस पाठवली जाणार आहे.” (sanjay raut slams bjp modi government over aishwarya rai questioned by ed for panama leak case)

एकीकडे ऐश्वर्या राय बच्चनची ईडीकडून चौकशी चालू आहे, तर दुसरीकडे समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन केंद्र सरकारवर टीका करत होत्या. त्यावेळी काही बीजेपी नेत्यांनी त्यांच्याशी वाद घातला. यावर त्या खूप चिडल्या आणि म्हणाल्या की, “बीजेपीचे वाईट दिवस येणार आहे, हा माझा शाप आहे.”

जया बच्चन यांनी पुढे सांगितले की, “तुमच्याकडून आणखी काय अपेक्षा ठेवली पाहिजे? तुम्हाला ही चर्चा होऊन द्यायची नाहीये. या आणि आमचा सगळ्यांचा गळा दाबा. तुम्हीच सभागृह चालवा. तुम्ही या सभागृहात बसलेल्या आणि बाहेर बसलेल्या १२ लोकांसोबत काय करत आहेत? आम्हाला न्याय पाहिजे. परंतु सत्ताधारी पक्षाकडून याची अपेक्षा केली जाणार नाही.” त्यांच्या या वक्त्यव्यानंतर त्या खूप चिडल्या होत्या. त्या मोठमोठ्या आवाजात बोलत होत्या ज्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता.

हेही वाचा :

‘डिलिव्हरी झाल्यावर मला ५०-५० हजार रुपये द्या’, भारती सिंगने फोटोग्राफरकडे केली अजब मागणी

अरेरे..! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा हॉटेलच्या २२व्या मजल्यावरुन पडल्याने मृत्यू, पोलिसांना वेगळीच शंका

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर २०२२ मध्ये अडकणार विवाहबंधनात? ज्योतिषी जगन्नाथ गुरुजींनी केला खुलासा

 

 

हे देखील वाचा