बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित सध्या राजकारणात प्रवेश करण्याच्या शक्यतेमुळे चर्चेत आहे. माधुरी दीक्षित लवकरच भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. याआधीही माधुरी दीक्षित भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, त्यावेळी माधुरी दीक्षितने राजकारणात प्रवेश करण्याचा माझा विचार नाही, असे स्पष्ट केले होते.
मात्र आता पुन्हा एकदा माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) राजकारणात प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला भाजपच्या वरिष्ठ नेत्यानेही काही प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले की, माधुरी दीक्षित यांची लोकसभा निवडणुकीसाठी विचारणा केली जाऊ शकते. माधुरी दीक्षित ही मुंबईत राहते आणि तिच्याकडे मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे तिला मुंबईतील एका मतदारसंघातून तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे.
काही महिन्यांपूर्वी गणेशोत्सवादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. या चर्चेनंतर माधुरी दीक्षित मुंबईतून भाजपातर्फे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणूकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
माधुरी उत्तर पश्चिम मुंबईतून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मात्र, ही जागा शिवसेनेच्या खात्यात असून, शिंदे गटात असलेले गजानन कीर्तिकर येथून खासदार आहेत. मात्र, यावेळीही त्यांची प्रकृती ठीक नाही. माधुरी दीक्षित हिने या चर्चेवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, जर त्यांनी राजकारणात प्रवेश केला तर ती भारतीय राजकारणात मोठी बातमी ठरेल. माधुरी दीक्षित भाजपकडून निवडणूक लढणार का? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. मात्र, या चर्चेमुळे भारतीय राजकारणात नवीन नाट्यमय वळण येण्याची शक्यता आहे. (Talks of actress Madhuri Dixit contesting elections from BJP)
आधिक वाचा-
–अनुष्का शर्माने पती विराटचं तोंडभरून केलं कौतुक; म्हणाली, ‘माझं भाग्य आहे की… ‘
–पैशावाल्यांचे गिफ्ट बी भारीच राव! मितालीने नवरा सिद्धार्थला पाडव्याचे दिले ‘हे’ महागडे गिफ्ट