तमन्ना भाटिया झाली ‘ब्लॅक लेडी!’ तब्बल ‘इतक्या’ किंमतीचा गाऊन घालून लावली सोशल मीडियावर आग

‘बाहुबली’ फेम तमन्ना भाटिया तिच्या लूक आणि स्टाईलमुळे अनेकदा चर्चेत असते. साऊथ आणि बॉलिवूडमध्ये तिने तिचे चांगलेच फॅन फॉलोविंग तयार केले आहे. सोशल मीडियावर सुद्धा तिला लाखो फॉलोवर्स आहेत. तमन्ना नेहमीच तिच्या लुक्सवर वेगवेगळे प्रयोग करताना दिसते. तिला विविध लूक चांगले देखील दिसतात. ती बऱ्याचदा तिच्या फोटोशूटचे फोटो फॅन्ससोबत शेअर करताना दिसते. अलीकडेच तिने इंस्टाग्रामवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटची काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये तमन्ना ब्लॅक गाऊनमध्ये दिसत असून, तिच्या या ड्रेसची आणि लूकची बरीच चर्चा रंगताना दिसत आहे. काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये तमन्ना खूपच सुंदर दिसत आहे. तिचे चाहते तिच्या या फोटोंवर भरपूर प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या चाहत्यांसोबतच कलाकार देखील तिच्या या फोटोंवर कमेंट्स करत आहे. (tamannaah bhatia shared very beautiful pictures in black gown)

View this post on Instagram

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks)

तमन्नाने हा गाऊन मास्टरशेफ तेलगूच्या नुकत्याच झालेल्या भागात परिधान केला होता. काळ्या रंगाच्या मरमेड स्टाईल गाऊनला वेगवेगळ्या फुलांचे काॅम्बिनेशन केले आहे. तमन्नाच्या या गाऊनला सुकृती ग्रोवर यांनी मिनिमल डिझाइनमध्ये डिझाइन केले आहे. तमन्नाच्या ज्वेलरीबद्दल सांगायचे झाले तर तिने खूप कमी ज्वेलरी घातली असून त्यात तिने बोटांमध्ये काळ्या रंगाच्या रिंग घातल्या असून, कानात लांब फॅन्सी कानातले घातले आहे. तर केस वरती बांधले आहे. तिच्या या लूकवर तिच्या आत्मविश्वास आणि रुबाब खूपच वाखाणण्याजोगा आहे.

तमन्नाच्या या फोटोला इंस्टाग्रामवर ७० हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. तर या फोटोवर चाहते हार्ट ईमोजीचा पाऊस पाडत आहेत. तसेच एक चाहत्यांने लिहिले की,‘ तमन्ना तु खूपच सुंदर दिसत आहेस”. तमन्नाचा हा ड्रेस अमेरिकन ब्रँडचा आहे, ज्याचे नाव मार्चेसा आहे. हा ब्रँड २००४ मध्ये जॉर्जिना चॅपमन आणि कॅरेन क्रेग यांनी तयार केला होता.

FarFetch.com या वेबसाइटनुसार, या ड्रेसची किंमत $५,६४२ आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार त्याची किंमत सुमारे ४,१५,८५७.७२ रुपये आहे. यामुळेच तमन्नाच्या या ड्रेसची सर्वत्र चर्चा होत आहे. तसेच अनेक चाहत्यांचे या ड्रेसने लक्ष वेधून घेतले आहे.

तमन्ना विषयी बोलायचे झाले ,तर तमन्ना पुढे तेलुगु स्पोर्ट्स ड्रामा ‘सीतइमार’ मध्ये दिसणार आहे. ती रितेश देशमुखसोबत ‘प्लॅन ए प्लॅन बी’ चित्रपटातही दिसणार आहे. रितेश आणि तमन्नासोबत पूनम ढिल्लन आणि कुषा कपिला देखील या चित्रपटात भूमिका साकारणार आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी स्वत:ला स्टारकिड मानत नाही’; अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे मोठे वक्तव्य

-‘इंडियन आयडल १२’च्या ग्रँड फिनालेने टेलिव्हिजन विश्वात नोंदवला ‘हा’ खास विक्रम; टीमने आनंद साजरा केला

-‘बिग बीं’च्या सुरक्षेत तैनात हेड कॉन्स्टेबलची झाली बदली; पगाराची माहिती मिळताच बॉडीगार्डविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश

Latest Post