Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

तमन्ना भाटिया ‘मास्टरशेफ तेलुगू’ शोवर करणार कायदेशीर कारवाई, काय आहे पूर्ण प्रकरण?

आपल्या अदाकारीमुळे चर्चेत असणारी दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया, सध्या भलत्याच कारणावरून चर्चेचा भाग बनली आहे. तमन्नाने चाहत्यांना ऑगस्टमध्ये टीव्ही पदार्पण करणार असल्याबद्दल माहिती दिली होती. ‘मास्टरशेफ तेलुगु’ होस्ट करण्याबद्दल तिने चाहत्यांना सांगितले होते. तिने हा शो होस्ट केला होता. तमन्नाने याचे होस्टिंग केले होते, तर हैदराबादचे शेफ संजय थुम्मा, चलपती राव आणि महेश पडाला यांनी या शोला जज केले होते. (tamannaah bhatia to take legal action against masterchef telugu know the reason)

तमन्नाने हा शो होस्ट केला होता आणि चाहत्यांना तिची होस्टिंग स्टाईल खूप आवडली होती. पण आता शोचे निर्माते आणि तमन्ना यांच्यात काही मतभेद निर्माण झाल्याचे समोर आले आहे. माध्यमातील वृत्तानुसार, तमन्ना आणि शोच्या निर्मात्यांमध्ये काही आलबेल नाहीये. निर्मात्यांनी तमन्नाशी संभाषणाचे सर्व मार्ग बंद केले आहेत. ज्यामुळे अभिनेत्रीने कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण
माध्यमातील वृत्तानुसार, निर्मात्यांशी बोलणी बंद झाल्यानंतर तमन्नाने कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, ‘मास्टरशेफ तेलुगू’च्या प्रॉडक्शन हाऊसने पेमेंट्स न दिल्याने आणि अव्यावसायिकतेने अभिनेत्रीला कायदेशीर कारवाई करण्यास भाग पाडले गेले आहे. पैसे न मिळाल्यानंतरही तमन्नाने तिच्या सर्व कमिटमेंट्स रद्द केल्या आणि तिचा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, प्रॉडक्शन हाऊसने तिच्याशी बोलणे बंद केले आहे.

‘ही’ अभिनेत्री करणार रिप्लेस
काही दिवसांपूर्वी असे वृत्त आले होते की, टीव्ही शो ‘मास्टरशेफ तेलुगू’ तमन्ना भाटियाला रिप्लेस करणार आहे. अहवालांनुसार, अनसूईया भारद्वाज तमन्नाची जागा घेणार होती. अनसूईयाने शोचा काही भाग शूटही केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तमन्ना भाटिया झाली ‘ब्लॅक लेडी!’ तब्बल ‘इतक्या’ किंमतीचा गाऊन घालून लावली सोशल मीडियावर आग

-तमन्ना भाटियाने ‘किस मी मोर’ गाण्यावर लावले ठुमके; पाहून तुमचेही थिरकतील पाय

-तमन्ना भाटियाचा समर लूक प्रेक्षकांना घालतोय भुरळ, सोशल मीडियावर केला व्हिडिओ शेअर

हे देखील वाचा