तमन्ना भाटियाने ‘किस मी मोर’ गाण्यावर लावले ठुमके; पाहून तुमचेही थिरकतील पाय


‘बाहुबली’ या चित्रपटात अवंतिकाचे पात्र निभावणारी शूर, धाडसी अभिनेत्री तमन्ना तर सर्वांनाच आठवत असेल, नाही का? या चित्रपटानंतर तमन्ना भाटिया ही खूप चर्चेत आली होती. या चित्रपटातील तिची भूमिका सर्वांना खूप आवडली होती. तसेच हा चित्रपट वेळवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित झाल्याने तिची लोकप्रियता गगनाला भिडली. तमन्ना चित्रपटासोबतच सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे इंस्टाग्रामवर 13.4 मिलियनपेक्षाही जास्त फॉलोवर्स आहेत. तिची प्रत्येक अदा तिच्या चाहत्यांना भुरळ घालते. तिचा वेस्टर्न लूक असो किंवा इंडियन लूक असो. चाहत्यांना तिचे फोटो खूप आवडतात. तिच्या बोल्ड फोटोमुळे ती अनेकवेळा चर्चेत असते. तिचे डान्स व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात.

तमन्ना आता पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘किस मी मोर’ या इंग्लिश गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत कोरिओग्राफर साजिया समजी देखील दिसत आहे. (Tamannaah bhatia’s kiss me more song dance video viral on social media)

तमन्नाने शेअर केला हा व्हिडिओ प्रचंड संख्येने पाहिला जात आहे. या व्हिडिओमध्ये ट्रॅक पँट परिधान करून तिचा वेगळाच बिनधास्त अंदाज पाहायला मिळत आहे. तिच्या डान्स मुव्हज देखील पाहण्याजोग्या आहेत. हा व्हिडिओ शेअर करून तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “फालतू गोष्टी काढून टाका.”

तिची ही पोस्ट तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहे. या व्हिडिओला काही तासातच 3 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच दोन हजारांपेक्षाही अधिक कमेंट्स आल्या आहेत.

तमन्ना भाटियाला या आधी अक्षयच्या ऍक्शन चित्रपटात पाहिले गेले होते. तमन्नाने चित्रपट‌सृष्टीत आल्यानंतर देखील मॉडेलिंगमध्ये तिचे नाव कमावले आहे. तिने तमिळ, तेलुगू, हिंदी सोबतच इतर अनेक भाषांमध्ये 50 पेक्षाही जास्त चित्रपटात काम केले आहे. नुकतेच तिने दोन वेबसीरिजमध्ये देखील काम केले आहे. माध्यमातील वृत्तानुसार, ती लवकरच ‘बोले चुडिया’ या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करीना आणि सैफच्या दुसऱ्या मुलाचे नाव झाले फायनल; आजोबा रणधीर कपूर यांनी दिली माहिती

-जोहरा सेहगल यांना बिग बी म्हणाले होते, ‘१०० वर्षांची मुलगी’; तर मजेदार होती त्यांची शेवटची ईच्छा

-संस्कृती बालगुडेने घोड्यासोबत केलं फोटोशूट; हटके फोटोंना मिळतोय चाहत्यांचा प्रतिसाद


Leave A Reply

Your email address will not be published.