Saturday, June 29, 2024

तामिळ सुपरस्टार अजित कुमारवर कोसळला दुःखाचा डोंगर, ‘या’ जवळच्या व्यक्तीचे झाले निधन

पी सुब्रमण्यम यांनी २४ मार्च रोजी चेन्नई येथे अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्री साक्षी अग्रवालने पी सुब्रमण्यम यांच्या निधनाबद्दल ट्विट करत दुःख व्यक्त केले आणि तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “अजित कुमार सर आणि त्यांच्या कुटुंबाप्रती माझी संवेदना आहे. देव त्यांना या दुःखाच्या समयी शक्ती प्रदान करो.”

दरम्यान अजित कुमार देव सध्या देशाबाहेर आहे. मागील काही दिवसांपासून तो त्याची पत्नी आणि मुलं यांच्यासोबत युरोपमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या पत्नीने या सुट्ट्यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. आता वडिलांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर लवकरच अजित चेन्नईमध्ये परतणार असल्याचे सांगितले जात आहे.

पी सुब्रमण्यम यांचे कुटुंब मूळचे केरळमधील पलक्कड़ जिल्ह्यातील आहे. आता त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी मोहिनी आणि अनुप कुमार, अजित कुमार आणि अनिल कुमार ही तीन मुलं आहेत. पी सुब्रमण्यम यांच्या निधनानंतर आता सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. अनेक कलाकारांनी आणि फॅन्सने त्यांना सांत्वना देत मजबूत राहण्याचे सांगितले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

क्या बात है! ‘हा’ साऊथ सुपरस्टार झाला मुंबईकर, खरेदी केले तब्बल ७० कोटींचे आलिशान घर

गुपित झाले उघड! ‘टायगर 3’ मधील शाहरुखचा कॅमिओ सीन लीक, पठाणच्या मदतीने टायगर करणार पलायन

हे देखील वाचा