तमिळ अभिनेते-दिग्दर्शक मनोबाला यांचे वयाच्या 69व्या वर्षी चेन्नईत निधन झाले. मनोबाला हे गेल्या दोन आठवड्यांपासून रुग्णालयात दाखल हाेते. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर अभिनेता-दिग्दर्शक जीएक कुमार यांनी ट्विटरवर माहिती देऊन “मनोबाला सर यांचे निधन झाले,” असल्याचे सांगतले.
माध्यमातील वृत्तानुसार, मनोबाला यांना चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, बुधवारी (दि. 3 मे)ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी उषा आणि मुलगा हरीश असा परिवार आहे.
तमिळ सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आणि चाहत्यांनी व्यक्त केला शोक
Heartbreaking to hear that Director/Actor #Manobala sir is no longer with us.
Was a true pleasure to work with you sir!
You will be surely missed! ????
Condolences to family, friends and loved ones…#RIPManobala pic.twitter.com/Ou2QBGsYLs— Gautham Karthik (@Gautham_Karthik) May 3, 2023
Rest in Peace Manobala sir ???? pic.twitter.com/nCi8JeEB2O
— Vijay Fans Trends (@VijayFansTrends) May 3, 2023
मनोबाला यांनी 1979 मध्ये ‘पुथिया वरपुगल’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. कमल हासनच्या मदतीने त्यांनी ‘भारतीराजा’ चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शकाची कामगिरी तर सांभाळलिच, पण त्यात छोटी भूमिकाही केली. मनोबाला यांनी 200 हून अधिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना दाखवली आहे.
सण 1982मध्ये कार्तिक आणि सुहासिनी अभिनीत ‘आगया गंगाई’ मधून दिग्दर्शनात पदार्पण केल्यानंतर, रजनीकांतसोबत ओरकवलन (1987), मोहनसोबत ‘पिल्लई निल्ला’ (1985) यासारख्या दमदार चित्रपटाचे दिग्दर्शन केले.
विनोदी कलाकार म्हणून त्यांनी ‘गजनी’, ‘अभियुम नानुम’ आणि ‘थुपक्की’ सारख्या चित्रपटांमध्ये संस्मरणीय भूमिका साकारल्या. ‘भूत आणि कोंड्राल पावम’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होते. (tamil actor and director manobala dies at 69 in chennai )
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
विकिपीडिया मावशींची ‘ही’ चूक ठरली जेष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांच्यासाठी डोकेदुखी
“सलमानसाठी सर्वात सुरक्षित जागा…” सलमान खानच्या सुरक्षेवर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य










