बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांचा अभिनेता सिद्धार्थ (Siddharth) सायना नेहवालवर (Saina Nehwal) अभद्र कमेंट करून वादात सापडला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. इतकेच नाही, तर नेटकऱ्यांनी त्याला फ्लॉप अभिनेता देखील म्हटले आहे. अशी कमेंट करताना सिद्धार्थ कदाचित विसरला असेल की, सायना नेहवाल २०१२ साली ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक, २०१५मध्ये विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्य आणि २०१७ मध्ये कांस्यपदक विजेती होती. ही सर्व पदके तिने देशासाठी मिळवली आहेत.
खरं तर, सायना नेहवालने पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींवर ट्वीट केले आणि लिहिले, “जर पंतप्रधानांच्या सुरक्षेशी तडजोड होत असेल तर कोणतेही राष्ट्र स्वतःला सुरक्षित असल्याचा दावा करू शकत नाही. पंतप्रधान मोदींवर अराजकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करते.” (tamil actor siddharth attacked badminton player saina nehwal with sexually derogatory comment)
No nation can claim itself to be safe if the security of its own PM gets compromised. I condemn, in the strongest words possible, the cowardly attack on PM Modi by anarchists.#BharatStandsWithModi #PMModi
— Saina Nehwal (@NSaina) January 5, 2022
यावर सिद्धार्थने लिहिले की, “*** चॅम्पियन ऑफ वर्ल्ड… देवाचे आभार मानतो की आमच्याकडे भारताचे रक्षक आहेत.”
Subtle cock champion of the world… Thank God we have protectors of India. ????????
Shame on you #Rihanna https://t.co/FpIJjl1Gxz
— Siddharth (@Actor_Siddharth) January 6, 2022
या आक्षेपार्ह कमेंटनंतर अभिनेता सिद्धार्थला चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे. एका युजरने लिहिले, “एखाद्यासाठी अशी भाषा? खासकरून ज्यांनी देशाचा गौरव केला आहे. हे सर्व पैसे कमावण्यासाठी आहे का? अभिनेता म्हणून तू आधीच नीच आहेस, आता तुझी माणुसकीही गेली आहे का?” एका युजरने लिहिले, “कृपया मानसशास्त्रज्ञाचा सल्ला घे.. तुझ्या मेंदूने काम करणे बंद केले आहे. ज्यांनी करिअरमध्ये फ्लॉप चित्रपट दिले ते सायनाला शिकवायला आले आहेत.” त्याचबरोबर काही युजर्सने ट्विटरवरून सिद्धार्थचे अकाउंट सस्पेंड करण्याची मागणीही केली आहे.
सिद्धार्थने साऊथ चित्रपटांसोबतच बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. ‘रंग दे बसंती’ या हिट चित्रपटात सिद्धार्थ दिसला होता. त्याचा ‘चश्मे बद्दूर’ हा चित्रपटही प्रेक्षकांना आवडला होता. सिद्धार्थ नेहमीच सोशल मीडियावर अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडतो, त्याने अनेक मुद्द्यांवरून भाजपवरही निशाणा साधला आहे.
हेही नक्की वाचा-