दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री हंसिका मोटवानी हिने अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. तिने साउथच नाही तर हिंदी चित्रपटातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. नुकतंच अभिनेत्री विवाह बंधनात अडकली आहे. तिने अनेक वर्ष नात्यामध्ये असणाऱ्या बॉयफ्रेंडसोबत विवाह केला आहे. गेल्या काही दिवसांपासून हंसिका आपल्या लग्नासाठी चर्चेत होती, शेवटी 4 डीसेंबर रोजी राजस्थानमध्ये रॉयल पद्धतीने हा विवाह सोहळा थाटामाटात उरकला. अशातच अभिनेत्री आपल्या चाहत्यांसाठी एक सरप्राईज घेऊन येत आहे, ज्याचा व्हिडिओ तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.
लोकप्रिय अभिनेत्रा हंसिका मोटवानी (Hansika Motwani) हिने आपल्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने तिच्या ‘हंसिका लव शादी ड्रामा’ (Hansika Love Shadi Drama) या आगामी येणाऱ्या कार्यक्रमाबद्दल माहिती सांगितली आहे. या कार्यक्रमामध्ये लग्नामध्ये होणाऱ्या छोट्यातील छोट्या परंपपरा आणि रितीरिवाज दाखवण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम आउट-एंड-आउट रियलिटी शो होणार आहे, जो ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित केला जाइल.
हंसिका मोटवानी या व्हिडिओमध्ये कार्यक्रमाबद्दल सांगितले की, “हाय मी हंसिका मोटावनी नुकतंच माझ्या आयुष्यामध्ये खूप खास गोष्टी घडल्या आहेत, मी लग्न केलं आहे. माझं पूर्ण लग्न केवळ डिज्नी+हॉटस्टारवर तुम्हाला पाहायला मिळू शकते. या कार्यक्रमाचं नाव असणार आहे ‘लव शादी ड्रामा’. या कार्यक्रमामध्ये लग्नाच्या सजावटीपासून ते फॅशन डिझायनर पर्यत अने गोष्टी तुम्हाला दाखवल्या जातील.”
View this post on Instagram
सांगायचे झाले तर, हंसिका मोटवानीच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. मात्र, तिचं पूर्ण लग्न पाहाण्याची संधी तिने आपल्या चाहात्यांना दिली आहे, ज्यामुळे अभिनेत्री खूपच उत्साहाने या कार्यक्रमाचं प्रमोशन करत आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहते कमेंटचा वर्षाव करत आहेत त्याशिवाय अनेक चाहते अभिनेत्रीचं लग्न पाहाण्यासाठी खूपच उत्सुक आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ऐश्वर्या रायने आकार दिलेले सिनेमामुळे करिश्मा कपूर झाली सुपरस्टार, जाणून घ्या त्या सिनेमाबद्दल
‘नमू वाटलेलं तुम्ही…’, म्हणत तेजस्विनी पंडितने प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराववर व्यक्त केला संताप