धक्कादायक! तामिळ अभिनेत्याने मित्राच्या घरी गळफास लावून केली आत्महत्या, सिनेसृष्टीवर पसरली शोककळा


तमिळ टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये गेल्या काही वर्षांत आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपुर्वीच अभिनेत्री व्हीजे. चित्राने आत्महत्या केली होती. ही अभिनेत्री आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना तीने हा धक्कादायक निर्णय घेतला होता. हॉटेलच्या खोलीत स्वत: ला गळफास लावून तीने आपले जीवन संपवले होते. ‘एनाई नोकी पायम थोटा’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारा तरूण अभिनेता श्रीवात्सवानेही काही दिवसांपुर्वीच आत्महत्या केली होती.

माध्यमांत आलेल्या काही बातम्यांनुसार, तमिळ टीव्ही अभिनेता इंद्र कुमारने गळफास लावून आत्महत्या केली आहे. शुक्रवारी सकाळी चेन्नई येथील मित्राच्या घरी त्याचा मृतदेह आढळला. काही रिपोर्ट्सनुसार, हा अभिनेता आपल्या मित्राला भेटायला गेला होता आणि दुसर्‍या दिवशी सकाळी मित्राच्याच घरात त्याचा मृतदेह सापडला. त्याच्या मित्राला जेव्हा हे कळाले, तेव्हा त्याने पोलिसांना बोलवून याची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविला असून पुढचा तपास चालू आहे.

पोलिसांना त्याच्या मित्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंद्र कुमार हा संध्याकाळी चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो मित्राच्या घरी गेला. त्यावेळी घरात तो एकटाच होता. सकाळी जेव्हा त्याचा मित्र घरी आला आणि त्याने दार ठोठावले तेव्हा त्याला काहीच उत्तर मिळाले नाही. त्यानंतर त्याने दरवाजा उघडला आणि तेव्हा इंद्र कुमार मृत अवस्थेत आढळला.

अभिनेत्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच घटनास्थळावरून पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट मिळाली नाही. असे म्हटले जात आहे, की इंद्र कुमार टीव्ही मालिकांमध्ये काम करत होता आणि कामासाठी नवीन संधीच्या शोधात होता. त्याला काम मिळत नव्हते म्हणून तो खूप अस्वस्थ होता. तसेच, तो विवाहित होता आणि त्याला मूलही होते.


Leave A Reply

Your email address will not be published.