Saturday, June 29, 2024

‘तनू वेड्स मनू ३’ : आता चिंटूच्या प्रेमात पडणार तनू अशी असणार चित्रपटाची कहाणी

कंगना रणौतचा ‘तनू वेड्स मनू’ आणि रिटर्न्स हे दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर झाले आहेत. चित्रपटांना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. आता सगळेजण या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. अशातच कंगनाने तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. तिच्या ‘तनू वेड्स मनू’ या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा भाग खास असणार आहे. सगळेजण तिला असा प्रश्न विचारत आहेत की, तिसऱ्या भागात असे काय खास असणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार तिसऱ्या भागाची कहाणी जिशान अयुब आणि कंगना यांच्या पात्रावर असणार आहे.

अभिनेता जिशान अयुबने याबाबत खुलासा केला की, चित्रपटाचे लेखक हिमांशु शर्मा यावर काम करत आहेत. त्यांनी सांगितले की, अजून काहीही फिक्स झाले नाही. परंतु चित्रपटाची कहाणी त्यांना आणि कंगनाला मध्यास्थानी घेवून करणार आहेत. कंगना रणौतचा‌ ‘तनू वेड मनू’ हा चित्रपट २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात कंगनासोबत आर माधवन, जिमी शेरगिल, स्वरा भास्कर आणि दीपक डोबरियाल हे कलाकार होते.

दुसऱ्या भागात म्हणजेच ‘तनू वेड मनू रिटर्न्स’ २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात जुन्या कलाकारांसोबत जिशान देखील होता. या चित्रपटात जबरदस्त अभिनयासाठी कंगना का अनेक पुरस्कार देखील मिळाले. कंगना अनेक विषयांवर बेधडकपणे तिचे मत मांडत असते त्यामुळे तिचे वाद देखील होत असतात.

कांगणाचा कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती रिऍलिटी शो ‘लॉकअप’ ,होस्ट करत आहे. तिचा हा शो चांगलाच चर्चेत आहे. यासोबत तिच्याकडे अनेक मोठे चित्रपट देखील आहे. ती आगामी काळात ‘धाडक’, ‘तेजस’ आणि ‘सीता: यांसारख्या अनेक मोठ्या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा :

हे देखील वाचा