Sunday, April 28, 2024

यावर्षी ‘हे’ टीव्ही कलाकार बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण, चाहते त्यांचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी उत्सुक

टेलिव्हिजनवर आपल्या अभिनयाची आणि अंदाजाची ताकद दाखवल्यानंतर आता अनेक सेलिब्रिटींनी बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर थैमान घालण्याची तयारी केली आहे. शंतनू माहेश्वरी ते रुबीना दिलैकचा छोट्या पडद्यापर्यंतचा प्रवास २०२२ मध्ये पूर्ण होणार आहे. शंतनू, रुबीना, अवनीत कौर हे काही पहिले सेलिब्रिटी नाहीत ज्यांनी टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास केला आहे. यापूर्वी अनेक सेलिब्रिटींनी मोठ्या पडद्यावर आपले अभिनय कौशल्य दाखवले असून या यादीत पहिले नाव सुशांत सिंग राजपूतचे आहे. सुशांत सिंग राजपूतने झी टीव्हीच्या पवित्र रिश्ता मालिकेत भूमिका केली. पुढे बॉलिवूडमध्ये त्याने ‘धोनी’, ‘केदारनाथ’, ‘काई पोचे’ सारखे सुपरहिट चित्रपट दिले होते. टीव्हीपासून चित्रपटांमध्ये जाणाऱ्या या सेलिब्रिटींकडून चाहत्यांना आता त्याच अपेक्षा आहेत.

शंतनू माहेश्वरी

लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेता, डान्सर, कोरिओग्राफर शंतनू माहेश्वरीने (Shantanu Maheshwari ) संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटात शंतनू आलिया भट्टसोबत रोमँटिक सीन करताना दिसला आहे.

रुबीना दिलैक

रुबीना दिलैक (Rubina Dilaik) ‘बिग बॉस सीझन १४’ ची विजेती आहे. अभिनेत्रीने अनेक टीव्ही शोमध्ये तिच्या अभिनयाची ताकद दाखवली आहे. रुबीनाने बॉलिवूडपूर्वी ओटीटीमध्ये पदार्पण केले आहे. अभिनेत्रीची अलीकडील सीरिज ‘वंडरलस्ट’ एमएक्स प्लेयरवर प्रदर्शित झाली आहे. रुबीना दिलैक ‘अर्ध’ हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

लक्ष्या

टीव्ही अभिनेता लक्ष्या (Lakshya) जो पूर्वी लक्ष्य लालवानी म्हणून ओळखला जात होता. करण जोहरच्या ‘बेधडक’ या चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. लक्ष्याने अधुरी कहानी हमारी आणि ‘पोरस’ या टीव्ही शोमध्ये त्याच्या अभिनयाची ताकद दाखवली आहे.

अवनीत कौर

टीव्ही अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार अवनीत कौर (Avneet Kaur) ‘टिकू वेड्स शेरू’मध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत (Nawazuddin Siddiqui) स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. अवनीतचा हा पहिला हिंदी बॉलिवूड चित्रपट असेल. माध्यमांतील वृत्तानुसार, अवनीत कौरचा पहिला चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

पार्थ समथान

‘कसौटी जिंदगी के’ या मालिकेत एरिका फर्नांडिससोबत रोमान्स करणारा अभिनेता पार्थ समथान (Partha Samthan) ‘घुडछडी’ या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रवीना टंडन आणि संजय दत्त यांच्याही मुख्य भूमिका आहेत. पार्थ समथानचा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे.

हे देखील वाचा