Sunday, June 4, 2023

अभिनेत्रीसोबत गैरव्यवहार करणे पोलिस कर्मचाऱ्याला पडले महागात, सुरू झाली अंतर्गत चौकशी

प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री आणि टेलिव्हिजन होस्ट अर्चना कवीने (Archana Kavi) पोलिसांवर गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर ही माहिती दिली, त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याला अंतर्गत चौकशीला सामोरे जावे लागले. ही घटना घडली, तेव्हा अभिनेत्री तिच्या मैत्रिणी आणि कुटुंबासह ऑटोमधून घरी परतत होती.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. अभिनेत्री आणि पोलिस दोघांचेही जबाब घेण्यात आले आहेत. पोलीस कर्मचारी रात्री गस्त घालत असताना ही घटना घडली. यावेळी अभिनेत्रीने फेस मास्क घातल्यामुळे तो तिला ओळखू शकला नाही.” अर्चना कवीने पोलिसांसोबतचा तिचा वाईट अनुभव सोशल मीडियावर शेअर केल्यावर ही घटना उघडकीस आली. पोलिस अत्यंत उद्धट होते आणि तिला सुरक्षित वाटत नसल्याचे अभिनेत्रीने म्हटले आहे. (malayalam actress archana kavi s allegation cop is facing internal probe)

कोचीचे उपायुक्त व्ही यू कुरियाकोस म्हणाले की, “कायद्याची सुरक्षा करणार्‍यांकडून या प्रकारचे असभ्य वर्तन, मग तो सेलिब्रिटींसोबत असो किंवा सामान्य माणसांसोबत असो, पूर्णपणे स्वीकारार्ह नाही.” ते म्हणाले, “मी या प्रकरणात महिला आणि पोलिस दोघांचेही म्हणणे ऐकले आहे. अभिनेत्रीचे सामान्यतः पोलिसांबद्दल चांगले मत आहे, परंतु या घटनेने तिला दुःखी केले आहे.”

पोलिस कर्मचाऱ्याचा हेतू दुखावण्याचा नव्हता, असेही ते पुढे म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, ते गस्तीवर असताना केवळ माहिती घेत होते. पोलिस कर्मचाऱ्याला पुन्हा बोलावून आवश्यक असल्यास त्याच्यावर विभागीय कारवाई केली जाईल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा