Wednesday, June 26, 2024

पंकज त्रिपाठीच्या ‘मैं अटल हूं’ ’चा टिझर रिलीज, अभिनेत्याच्या धमाल शैलीने जिंकले चाहत्यांची मने

राजकारणाच्या दुनियेत अटल बिहारी वाजपेयी हे स्वतःची वेगळी ओळख असलेले व्यक्तिमत्व राहिले आहे. त्यांची दृष्टी, शैली, संभाषणे आणि कार्य लोक अजूनही लक्षात ठेवतात. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांचा बायोपिक बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असून, आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार आहे. या चित्रपटाचा टीझर समोर आला असून त्याच्या ‘मैं अटल हूं‘ या (Mai Atal Hoon) चित्रपटाचा ट्रेलरही 20 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. आपल्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेला बॉलिवूड स्टार पंकज त्रिपाठीचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

अटलबिहारी बाजपेयींच्या भूमिकेतील पंकज त्रिपाठीच्या (Pankaj Tripathi) ‘मैं अटल हूं’ या चित्रपटाच्या ट्रेलरपूर्वीच या चित्रपटाचा पहिला टीझर समोर आला आहे. या टीझरमध्ये अभिनेता अटलबिहारी बाजपेयींची व्यक्तिरेखा अतिशय चांगल्या पद्धतीने साकारत आहे. या चित्रपटाच्या टीझरची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे, ज्यामध्ये अटलची भूमिका साकारणारा पंकज त्रिपाठी राजकीय खेळी खेळताना दिसत आहे.

टीझरमध्ये पंकज त्रिपाठी हे राजकारणाविषयी बोलताना दिसत आहेत. ते म्हणतात, “दलों के इस दल दल के बीच एक कमल खिलाना होगा.” या डायलॉगमुळे टीझरमध्ये एक दमदार सुरुवात झाली आहे. टीझरमध्ये पंकज त्रिपाठी यांचा गेटअप चाहत्यांना खूप आवडला आहे. त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचे रूप उत्तम प्रकारे साकारले आहे.

टीझरवर नेटकऱ्यांनी खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी पंकज त्रिपाठी यांचे कौतुक केले आहे. एका युझरनं कमेंटमध्ये लिहिलं, “पंकजजी तुम्ही सर्वोत्कृष्ट आणि अष्टपैलू कलाकार आहात.” तर दुसर्‍या युजरने म्हटले की, “अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट दिल्याबद्दल धन्यवाद.”

 हा चित्रपट पुढील वर्षी 19 जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. (Teaser release of Pankaj Tripathi Main Atal Hoon based on the life of Atal Bihari Vajpayee)

आधिक वाचा-
शाहिद कपूरच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज कारची एंट्री, एवढी आहे किम्मत
‘मला पॉर्न बघायला आवडतं पण…’, ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा उल्लेख करत ‘या’ अभिनेत्याने केल धक्कादायक विधान

हे देखील वाचा