Friday, May 24, 2024

पंकज त्रिपाठी साकारणार अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका, जाणून घ्या कधी प्रदर्शित होणार चित्रपट

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्वप्न मोठ्या पडद्यावर आणण्याची जबाबदारी हिंदी चित्रपटसृष्टीने घेतली आहे. खरं तर, दिग्दर्शक रवी जाधव लवकरच ‘द अनटोल्ड वाजपेयी: पॉलिटिशियन अँड पॅराडॉक्स’ या पुस्तकावर आधारित चित्रपट आणणार आहेत. विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी “मैं रहू या ना रहू ये देश रहना चाहिये…” या बायोपिकमध्ये भारताच्या माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणार आहे.

पंकज (Pankaj Tripathi) यांनी निवेदनात म्हटले आहे की, “अशा मानवीय राजकारण्याची पडद्यावर भूमिका साकारणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. ते केवळ राजकारणी नव्हते तर, त्याहीपेक्षा ते एक उत्कृष्ट लेखक आणि प्रसिद्ध कवी होते. त्यांच्या जागी असणं हे माझ्यासारख्या अभिनेत्यासाठी एक साैभाग्याची गाेष्ट आहे.”

दुसरीकडे दिग्दर्शक रवी जाधव (Ravi Jadhav) म्हणाले की, “दिग्दर्शक म्हणून मी अटलजींच्या स्टाेरीपेक्षा चांगली स्टाेरी दिग्दर्शनासाठी मागू शकत नाही. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अटलजींची स्टाेरी पडद्यावर आणण्यासाठी माझ्यासोबत पंकज त्रिपाठी यांच्यासारखे  एक अनुकरणीय अभिनेता आहे. मला आशा आहे की, मी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करेन.”

अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनाभोवती फिरणाऱ्या या बायोपिकची घोषणा यावर्षी 28 जून रोजी झाली. पण, त्यावेळी चित्रपटाच्या स्टारकास्टची माहिती पब्लिक करण्यात आली नव्हती. मात्र, आता निर्मात्यांनी केवळ पंकज त्रिपाठीच्या उपस्थितीची घोषणा केली नाही तर, चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेशी संबंधित माहिती देखील शेअर केली आहे. रवी जाधव दिग्दर्शित हा चित्रपट पुढील वर्षी ख्रिसमसला प्रदर्शित होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.

भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि लिजेंड स्टुडिओज द्वारे प्रस्तुत, ‘अटल’ चित्रपटाची निर्मिती विनोद भानुशाली, संदीप सिंग, सॅम खान आणि कमलेश भानुशाली यांनी 70एमएम टॉकीजच्या सहकार्याने केली आहे व झीशान अहमद आणि शिव शर्मा या चित्रपटाचे सह-निर्मित आहेत. (actor pankaj tripathi to play atal bihari vajpayee in biopic main rahoon ya na rahoon yeh desh rehna chahiye atal)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
उर्फी जावेद झाली टॉपलेस, शक्कल लढवत मोबाईल-चार्जरपासून बनवली बिकिनी

विकी कौशलच्या चाहत्यांसाठी खुशखबर! लवकरच झळकणार ‘या’ आगामी सिनेमात

हे देखील वाचा