Tuesday, August 5, 2025
Home टेलिव्हिजन Wedding | पार पडली तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राची ‘रोका सेरेमनी’? ‘या’ गोष्टीने दिले संकेत

Wedding | पार पडली तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राची ‘रोका सेरेमनी’? ‘या’ गोष्टीने दिले संकेत

करण कुंद्रा (Karan Kundrra) आणि तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) यांची प्रेमकहाणी सर्वांनाच माहित आहे. ‘बिग बॉस 15’ च्या घरात दोन्ही कलाकारांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. दोघेही शोमधील टॉप 5 फायनलिस्ट बनले. या सीझनमध्ये तेजस्वी विजेती ठरली होती. शो संपल्यानंतर करण आणि तेजस्वी एकत्र स्पॉट झाले आहेत. दोघेही अनेकदा एकमेकांच्या पालकांसोबत खूपवेळा दिसले आहेत. त्यांचे चाहते त्यांना ‘तेजरन’ म्हणतात आणि त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, करण त्याच्या आई-वडिलांसोबत तेजस्वीच्या घराबाहेर दिसला.

बॉलिवूडचा प्रसिद्ध पॅपराझी व्हायरल भयानीने काही तासांपूर्वी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये करण कुंद्रा  आणि त्याचे आई-वडील तेजस्वी प्रकाशच्या घराबाहेर दिसत होते. ते सर्वजण करणच्या आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जमले होते. यावेळी करण कुंद्राने प्रिंटेड पांढऱ्या रंगाच्या शर्टसोबत काळी पँट परिधान केली होती. त्यावेळी त्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

चाहत्यांनी करण कुंद्राच्या कपाळावर टिळक पाहिले. त्यामुळे करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांचा रोका सेरेमनी गुरुवारी (10 मार्च) रात्री गुपचूप पार पडला की काय, असा अंदाज चाहते लावत आहेत. अनेक चाहत्यांनी कमेंट करून करण आणि तेजस्वीचे अभिनंदन करायला सुरुवात केली. एका चाहत्याने लिहिले की, “तुम्हा दोघांचे अभिनंदन. तो फक्त लग्नाचा वाढदिवस होता की, इतर समारंभही! #TeamRoka.”

करण-तेजस्वीच्या रोका सेरेमनीबद्दल चाहते लावतायेत अंदाज
करण कुंद्राच्या या व्हिडिओवर आणखी एका चाहत्याने कमेंट केली की, “रोका हो गया यार?” त्याचवेळी आणखी एका युजरने लिहिले की, “दोघांनी रोका केला का?” करण आणि तेजस्वी प्रकाश यांच्या नात्याबद्दल चाहते आधीच उत्सुक आहेत. मात्र, रोका सोहळ्याबाबत दोन्ही बाजूंकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

करण कुंद्रा-तेजस्वी प्रकाश वेडिंग प्लॅन
या वर्षाच्या सुरुवातीला करण कुंद्राला तेजस्वी प्रकाशसोबतच्या त्याच्या लग्नाच्या योजनांबद्दल विचारण्यात आले होते. ज्यावर करणने सांगितले की, त्याच्याकडे आजकाल एकमेकांसोबत घालवण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. तो म्हणाला की, दोघांचे शेड्यूल टाइट आहे आणि सध्या ते त्यांच्या आयुष्यात व्यस्त आहेत. त्यापूर्वी तेजस्वी प्रकाशने देखील माध्यमांशी बोलताना सांगितले की, ती तिच्या कामात खूप व्यस्त आहे आणि करणने लग्नाच्या नियोजनाच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत असे सांगितले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
करण कुंद्राची एक्स गर्लफ्रेंड अनुषा दांडेकर लग्नाशिवाय झाली आई, बाळाचे फोटो शेअर करत दिली माहिती
राहुल नागलच्या आधी करण कुंद्राला डेट करत होती श्रद्धा आर्या? अभिनेत्रीने केला खुलासा

हे देखील वाचा