×

‘बिग बॉसच्या विजेतेपदाची हवा गेलीय डोक्यात’, तेजस्वी प्रकाशच्या उद्धट वागण्यावर संतापले नेटकरी

‘बिग बॉस १५’ ची विजेती तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) सध्या सगळीकडे चर्चेत आहे. ‘बिग बॉस’चा किताब जिंकल्यानंतर तेजस्वी सगळीकडे चर्चेत आली होती. ‘बिग बॉस’च्या घरात सुद्धा तिने सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र आता एका व्हायरल व्हिडिओमध्ये लोक तेजस्वीला जोरदार ट्रोल करत आहेत. काय आहे या मागचे कारण चला जाणून घेऊ.

‘बिग बॉस १५’ची विजेती तेजस्वी प्रकाश सध्या सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. ‘बिग बॉस’च्या विजेतेपदाची माळ गळ्यात पडल्यामुळे तिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. बिग बॉसच्या घरात करण कुंद्रा (Karan Kundrra) आणि तिच्या प्रेम प्रकरणाची जोरदार चर्चा झाली होती. आता बाहेर आल्यानंतरही दोघेही सोबत फिरताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. मात्र यावेळी या व्हिडिओमधील तेजस्वीच्या उद्धट वागण्याने नेटकरी संतापले असून, तिला जोरदार ट्रोल केल जात आहे.

अलीकडेच तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा मुंबईमध्ये एकत्र फिरताना दिसून आले होते. त्यावेळी कॅमेरा घेऊन त्यांचे फोटो घेण्यासाठी काही पत्रकार त्यांच्या मागे धावत होते. त्यावेळी अचानक कॅमेरा बघून तेजस्वीने, “कुठून येता तुम्ही लोक? तुम्हाला आम्ही कुठे आहे हे कस काय समजतं?” असे म्हणत त्यांना हटकले. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होत असून, तेजस्वीचे हे बोलणे पाहून नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरले आहे. एका युजरने यावर प्रतिक्रिया दिली आहे की, “स्वतःच बोलावतात आणि नंतर कुठून आला म्हणतात.” तर आणखी एकाने म्हटले आहे, “दोघे मुद्दाम फोटोसाठी सोबत फिरतात.”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

तत्पूर्वी अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ‘बिग बॉस’ विजेती झाल्यापासूनच सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली आहे. तिच्या विजेतेपदावर सुद्धा अनेकांनी आक्षेप घेतला होता. कारण ‘बिग बॉस १५’ मध्ये प्रतीक सहजपाल विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. मात्र तेजस्वीच्या निवडीने सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले होते.

हेही पाहा –

हेही पाहा-

Latest Post