Monday, June 24, 2024

बाबांची आठवण आणि संस्कारांची शिदोरी! तेजस्विनीने वडिलांच्या वाढदिवसाच्या दिवशी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा

प्रत्येक मुलीचे तिच्या वडिलांसोबत एक वेगळे आणि खास नाते असते. वडील कधीही आईसारख्या शब्दात भावना मांडत नसले तरी त्यांचे त्यांच्या मुलांवर आईइतकेच प्रेम असते. मुलींसाठी देखील त्यांचे वडील त्यांच्यासाठी एक हिरो असतात. मुली वडिलांबद्दल त्यांच्या मनात असलेले प्रेम, संधी मिळाली व्यक्त करत असतात. याला अभिनेत्री देखील अपवाद नाही. नुकतेच मराठी इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या तेजस्विनी पंडितने देखील नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला.

तेजस्विनीच्या वडिलांचे रणजित पंडित यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तेजस्विनीने एक भावनिक पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. यात तिने तिच्या वडिलांबद्दल आणि त्यांच्या संस्कारांबद्दल लिहिले आहे. या पोस्टसोबतच तिने दोन फोटो देखील शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये दोन जुने फोटो दिसत आहे, तर एका फोटोत तेजस्विनी वडिलांसोबत दिसत आहे.

तेजस्विनीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, ““मला अनेकांनी विचारलं तुझं prized possession काय आहे…..?! घड्याळ, अंगठ्या, कपडे, पर्स,soft toys की आणखी काही…..”
“काय असं आहे जे तू कधीच कुणाला देणार नाहीस किंवा ते हरवलं तर तुझा एखादा भाग नाहीसा झाला असं तुला वाटेल…! तर ह्या त्या 2 गोष्टी आहेत. माझं माझ्या बाबांवरचं प्रेम सगळ्यांनाच माहीत आहे. बाबा ने मला माणूस म्हणून घडवलं….बाबाने मला संस्कारासोबत आणखी काय दिलं तर एक चांगला Cook होण्याचा वारसा बाबा देऊन गेला, ठेऊन गेला….हे 2 चमचे आमच्याकडे माझा जन्म झाला तेंव्हापासून आहेत. आम्ही मोठ्या होत असताना बाबा catering student आणि आमचं चहा पावडरचं दुकान होतं म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आम्हा बहिणींना चहा करायला शिकवला. ”

पुढे ती म्हणाली, “आमच्याकडे चहा वेगळ्या पद्धतीने बनतो. आणि तो perfect लागतो असं मला वाटतं. त्या चहा पावडर च्या मापाचा हा एक चमचा. आणि दुसरा तो साखरेचा चमचा. त्याची दांडी तुटली आहे . पण आजतागायत तो चमचा कधी replace झाला नाही. कारण स्वयंपाकातील “प्रमाण” ह्याचं आमच्या घरी जाम महत्व….हे चमचे फक्त माझ्या बाबाची आठवण नसून आमच्या संस्कारातल्या , शिकवणीचं प्रमाण आहे. ज्यावर माझं “प्रमाणाबाहेर” प्रेम आहे. “तोलून मापून चहा करता येईल पण बाबावरचं माझं प्रेम मोजता येणं निव्वळ अशक्य ! आज त्याच्या वाढदिवसा निमित्त लिहावसं वाटलं कारण बाबा चे खूप photos नाहियेत आमच्याकडे. कॅमेराचं महत्व मला कळायच्या आधीच त्याने exit घेतली. आजही तुला तितकंच miss करतो आम्ही बाबा ! जिथे कुठे असशील, देव बरे करो…Happy Birthday Baba ?,”

तेजस्विनीने नकारात्मक भूमिका साकारत मराठी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. मात्र तिने तिच्या प्रतिभेने, सौंदर्याने आणि व्यक्तिमत्वाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. मालिका, सिनेमे आणि वेबसिरीज या तिन्ही माध्यमांमध्ये तिने तिचा ठसा उमटवला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Birthday: लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये होती नेहा पेंडसे, तर दोन मुलींचा पिता आहे अभिनेत्रीचा पती

-टॅटूची शौकीन आहे व्हीजे बानी, ‘रोडीज’चे अनेक सीझन होस्ट करून बनलीय तरुणांच्या गळ्यातील ताईत

-दुःखद! कोरिओग्राफर शिवा शंकर यांचे निधन, बराच काळ चालू होता कोरोनाशी लढा

हे देखील वाचा