मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत सोज्वळ, सुंदर, निरागस आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान होय. अनेक मालिकांमधून तसेच चित्रपटातून ती घराघरात पोहचली आहे. उत्तम संवाद कौशल, योग्य टायमिंग, प्रत्येक भावना प्रेक्षकांपर्यंत पोहचवणे ही तेजश्रीची ओळख आहे. ऑनस्क्रीन प्रमाणेच ऑफस्क्रीन देखील तेजश्री एक प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. या गोष्टीची खात्री तिच्या या सोशल मीडिया पोस्टवरून पटते. तेजश्रीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटो प्रमाणेच या फोटोचे कॅप्शन सर्वांचे लक्ष वेधून घेतातना दिसत आहे.
तेजश्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने कुत्र्याच्या एका लहान पिल्लाला उचलून घेतले आहे. यामध्ये तिने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घातली आहे. या फोटोमध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “मी नेहमी या गोष्टीवर विश्वास करते की, आपण निभावत असलेल्या भूमिकेतून आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळतात. आज रेवाने माझी आयुष्यातील खऱ्या आनंदाशी ओळख करून दिली. मला कुत्र्याची खूप भीती वाटत होती. पण मला असा विश्वास आहे की, आपल्या भीतीचा सामना करण्याची भीती आपल्या भीतीपेक्षा जास्त असते.”
तिचा हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. तिचे अनेक चाहते या फोटोवर कमेंट करत आहेत अशातच अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी या फोटोवर कमेंट केली आहे की, “खूप छान मला तुझा खूप अभिमान आहे.’ (Tejshree pradhan find her real happiness, share photo on social media)
तेजश्रीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण तिची होणार ‘सून मी या घरची’ ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रात खूप गाजली होती. या मालिकेतील तिच्या जान्हवी नावाच्या पात्राला खूप पसंती मिळाली होती. तसेच तिची ‘अगंबाई सासूबाई’ ही मालिका देखील खूप लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील तिचे शुभ्रा नावाचे अत्यंत समंजस, विचारी आणि प्रॅक्टिकल पात्र प्रेक्षकांना खास पसंत पडले होते. याशिवाय तिने ‘लेक लाडकी या घरची’, ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकांमध्ये काम केले आहे. शिवाय तिने ‘ती सध्या काय करते’, ‘असेही एकदा व्हावे’, ‘लग्न पहावे करून’, ‘झेंडा’, ‘शर्यत’, ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अभिनयाच नव्हे, तर अभ्यासातही अव्वल आहे सारा; ‘या’ अवघड विषयात १०० टक्के मिळवत केलं होतं तिने टॉप