Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘वाढदिवसाची उत्तम सुरुवात’, म्हणत टेलिव्हिजन अभिनेत्री पूजा बॅनर्जीने शेअर केला तिचा क्लासी व्हिडिओ

प्रत्येक व्यक्तीसाठी तिचा वाढदिवस खूपच खास असतो. सर्वच लोकं त्यांच्या वाढदिवस कधी येईल याची ३६४ दिवस वाट पाहत असतात. अगदी ‘उत्सव मूर्ती’ म्हणून त्या दिवशी आपल्याला घरात आणि बाहेरही खास वागणूक मिळते, भेटवस्त मिळतात. त्यामुळे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच वाढदिवसाचे अप्रूप असते. कलाकारांचा वाढदिवस हा जितका त्यांच्यासाठी मोठा आणि आनंदाचा दिवस असतो, तितकाच त्यांच्या फॅन्ससाठी विशेष असतो. मनोरंजन विश्वात नेहमीच कलाकारांच्या वाढदिवसाचा मोठा बोलबाला दिसत असतो.

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आणि लोकप्रिय खलनायिका असणारी पूजा बॅनर्जी आज (८ नोव्हेंबर) रोजी तिचा ३० वा वाढदिवस साजरा करत आहे. यावर्षीचा वाढदिवस नक्कीच तिच्यासाठी खास आणि जास्त आनंद देणारा ठरला आहे, कारण पूजा प्रेग्नेंट असून ही आनंदाची बातमी तिने काही दिवसांपूर्वीच सर्वांसोबत शेअर केली आहे.

पूजाने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्या व्हिडिओला तिने ‘वाढदिवसाची उत्तम सुरूवात म्हणत शेअर केले आहे.” या व्हिडिओमध्ये पूजा घरातून निघून तिच्या गाडीत बसत असल्याचे आपल्याला दिसत आहे. अतिशय ग्लॅमरस आणि क्लासी लूकमध्ये दिसणारी पूजा व्हिडिओच्या सुरूवातीला घरात दिसते आणि नजरेचा एक कटाक्ष कॅमेऱ्याकडे बघत टाकते. दुसऱ्या सेकंदाला ती घराच्या बाहेर पार्किंगमध्ये दिसते आणि गॉगल घालून गाडीत बसते. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला फक्त संगीत वाजताना ऐकू येत आहे. या व्हिडिओमध्ये तिने मालती रंगाचा टॉप आणि पिवळ्या रंगाची पँट घातली आहे. यात तिच्या चेहऱ्यावर आई होणार असल्याचे एक वेगळे तेज आणि आनंद देखील दिसून येत आहे.

पूजाला ‘कसोटी जिंदगी की’ मालिकेतून तुफान प्रसिद्धी मिळाली सध्या ती ‘कुमकुम भाग्य’ मालिकेत दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच पूजाने ती आई होणार असल्याचे सोशल मीडिया पोस्टवरून सांगितले होते. पूजा उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्कृष्ट स्वीमर देखील आहे. तिने राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे स्विमिंगमध्ये प्रतिनिधित्व केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जड आवाजामुळे वर्गातून हाकलले जायचे, नंतर त्याच आवाजाने दिली खरी ओळख; वाचा पॉप क्वीन उषा उत्थुपबद्दल

-कॅटरिना आणि विकी कौशल यांची रोका सेरेमनी संपन्न, ‘या’ दिग्दर्शकाच्या घरी गुपचूप झाला कार्यक्रम

-काय सांगता! ‘सेक्रेड गेम्स’ वेबसीरिजमध्ये करायचे नव्हते नवाजुद्दीन सिद्दीकीला काम, स्वत:च सांगितले कारण

हे देखील वाचा