Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

भारती सिंगच नव्हे तर, ‘या’ कलाकारांनीही झिजवली कोर्टाची पायरी, यादी पाहाच

बॉलिवूड कलाकार असो किंवा टेलिव्हिजनचे ते जगासमोर आपली प्रतिमा जपतात. कलाकार या प्रतिमेसाठी प्रत्येक पाऊल फुंकून फुंकू ठेवतात. त्यांची सोशल मीडियावर सकारात्मक बाजूही पाहायला मिळत असतात. कधीकधी त्यांच्याशी संबंधित अशा गोष्टी देखील समोर येतात, ज्यामुळे या कलाकाराच्या प्रतिमेवर वाईट परिणाम होतो. टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे वादात सापडलं आहेत. त्यांची इच्छा नसतानाही न्यायालयाच्या फेऱ्या मारल्या आहेत. आरोपानंतर या कलाकारांनी कामापासून अंतर ठेवलं. त्याचबरोबर अनेकांना तुरुंगाताची हवा ही खावी लागली आहे. चला तर जाणून घेऊया अशाच काही स्टार्सबद्दल…

भारती सिंग
या यादीत पहिले नाव आहे कॉमेडी क्वीन भारती सिंग(Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया जे काही दिवसापूर्वी मोठ्या कायदेशीर अडचणीत सापडले होते. एनबीसीने दोघांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. सध्या दोघेही जामिनावर बाहेर आहेत, मात्र लवकरच या दोघांविरुद्ध ड्रग्ज प्रकरणी सुनावणी सुरू होणार आहे.

मुनमुन दत्ता
मुनमुन दत्ता(Munmun Datta) हिने तिच्या एका कमेंटमुळे अडचणीत आली आहे. मुनमुनवर जातीवर आधारित टिप्पण्या पडल्या, त्यानंतर अनेक ठिकाणी त्याच्यावर गुन्हेही दाखल झाले. सोशल मीडियावरही त्याला खूप ट्रोल करण्यात आले.

पायल रोहतगी
पायल रोहतगी(payal rohatgi) आणि वाद यांचे खूप घट्ट नाते आहे. पण, 2019 मध्ये नेहरू कुटुंबावर आक्षेपार्ह टिप्पणी करून ती तुरुंगात गेली आहे. त्याला राजस्थानच्या मध्यवर्ती कारागृहात राहावे लागले.

पर्ल वी पुरी
नागिन स्टार पर्ल वी पुरी(Pearl V Puri) याच्यावर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता, त्यामुळे तिला बराच काळ तुरुंगात राहावे लागले होते.

अरमान कोहली
अरमान कोहलीनेही तुरुंगाची हवा खाल्ली आहे. अरमानला बिग बॉस 7 च्या घरातूनच अटक करण्यात आली होती. माजी गर्लफ्रेंड नीरू रंधावाने त्याच्यावर मारहाणीसह अनेक गंभीर आरोप केले होते. काही दिवसांपूर्वी अरमानला या प्रकरणात जामीन मिळाला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धक्कादायक! मुलीला जन्म दिल्यानंतर आलियाच्या तब्येती बदल, वाचा सविस्तर
लावणीसम्राज्ञी मेघा घाडगेंनी गौतमी पाटीलवर केली टिका; म्हणाली,’परकर वर करेन अन् पाण्याची…’

हे देखील वाचा