Thursday, April 24, 2025
Home अन्य ‘इंडियन आयडल १२’ मध्ये आशिष कुलकर्णीचं गाण ऐकून अनु मलिक यांनी पकडले आपले कान, जाणून घ्या कारण

‘इंडियन आयडल १२’ मध्ये आशिष कुलकर्णीचं गाण ऐकून अनु मलिक यांनी पकडले आपले कान, जाणून घ्या कारण

हिंदी गाण्यांचा कार्यक्रम ‘इंडियन आयडल १२’ हा प्रत्येक आठवड्याच्या शेवटी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी, एक खास भाग घेऊन येत असतो. या आठवड्यात इंडियन आयडलमध्ये किशोर कुमार खास कार्यक्रम रंगणार आहे. जेथे किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार गांगुली कार्यक्रमामध्ये येणार असून, स्पर्धकांना प्रोत्साहित करताना दिसणार आहे. या आठवड्यात कार्यक्रमात अनु मलिकही हजेरी लावणार आहेत. कार्यक्रमामध्ये सध्या ‘इंडियन आयडल १२’ ट्रॉफी जिंकण्याची शर्यत आहे. प्रत्येक स्पर्धक तोडीस तोड गाताना दिसत आहे.

आशिष कुलकर्णी या आठवड्यात किशोर कुमार यांच्या ‘बाबू समझो ईशारे’ आणि ‘ये जो मोहब्बत है’ या गाण्यांवर सादरीकरण करणार आहे. आशिष इतका चांगला गातोय की, सर्व परीक्षक त्याची स्तुती करताना दिसतील. त्याचवेळी, अनु मलिक हे आशिषच्या कामगिरीवर, इतके प्रभावित होतील की, त्यांच्या कानांवर विश्वास बसणार नाही की, एखादा स्पर्धक इतका कमालीचा गाणं सादर करू शकतो. यावेळी त्याचे गाणे ऐकून अनु मलिक आपले कान पकडताना दिसतील.

सोनी टीव्हीने ‘इंडियन आयडल १२’ चा, नवीन प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये आशिष गाणे सादर करताना दिसत आहेत. त्याचे गाणे ऐकल्यानंतर, अमित दा खूप सुंदर म्हणून त्याचे कौतुक करतात. त्याचबरोबर हिमेश रेशमिया, नेहा कक्कर आशिषची स्तुती करण्यापासून स्वत: ला रोखू शकत नाहीत.

मागील आठवड्यात अनु मलिक, आणि गीतकार मनोज मुंतशिर कार्यक्रमध्ये खास पाहुणे म्हणून आले होते. त्या भागामध्ये आशिषने ‘ए भाई ज़रा देख के चलो’, ‘तुमने मुझे देखा होकर’ हे गाणे सादर केले होते. त्यानंतर अनु मलिक हे तेव्हापासूनच, त्याच्या गाण्याने वेडे झाले होते. त्या भागातील प्रत्येकासमोर, त्यांनी आशिषचा ऑटोग्राफही घेतला होता.

आशिषच्या गाण्यामुळे आनंदित अनु मलिक म्हणाले होते, ‘आशिष, मी तुझा खूप मोठा चाहता आहे. ही तुझी जबरदस्त कामगिरी आहे. मी तुझे गाणे यापूर्वी ऐकले आहे, आणि तुझा आवाज खूप चांगला आहे. मी या भागात येऊ शकल्यामुळे याचा मला आनंद आहे.’

कार्यक्रमाचा सुत्रसंचालक  आदित्य नारायण कोरोना विषाणूच्या सापळ्यात अडकला होता, ज्यानंतर तो काही आठवड्यांपासून कार्यक्रमामधून गायब होता. जय भानुशाली तेव्हा सुत्रसंचालक करत होता. गेल्या आठवड्यात आदित्य कार्यक्रमात परतला आहे. या कार्यक्रमात विजेतेपद कोणाकडे जाते. याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कधीही न विसरता येणारा!’ अल्लू अर्जुनच्या चिमुकलीने त्याच्यासाठी बनवला ‘खास डोसा’, कोरोना पॉझिटिव्हनंतर घरातच आहे क्वारंटाईन

-ऑक्सिजन लेव्हल वाढवण्याची पद्धत शिकवणाऱ्या कलाकारांवर अभिनेत्रीने साधला निशाना, म्हणाली…

-आयपीएलमध्ये खुलेआम केले होते किस, का झाले होते दीपिका पदुकोण आणि सिद्धार्थ मल्ल्याचे ब्रेकअप? अभिनेत्रीने केले स्पष्ट

हे देखील वाचा