‘तू वनराजचा पिच्छा का सोडत नाहीये?’ मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसा शर्माच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी विचारले प्रश्न

Televison actress Madalasa sharma's photo viral on Instagram


बॉलिवूड डान्सर आणि अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची सूनबाई मदालसा शर्मा ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करून ती चाहत्यांचे मनोरंजन करत असते. नुकतेच तिने ‘अनुपमा’ मालिकेतील सेटवरील तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

मदालसाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. तिच्या या फोटोवर तिचे चाहते तिला कमेंट करून तिच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचे कौतुक करत आहेत, तर काहीजण तिला तिच्या ‘काव्या’ नावाच्या पात्रावरून टोमणे मारत आहेत.

खरं तर स्टार प्लसवरील ‘अनुपमा’ या मालिकेमध्ये मदालसा काव्या नावाचे पात्र निभावत आहेत. या गोष्टीवरून तिला प्रेक्षक प्रश्न विचारत आहेत की, ती वनराज आणि अनुपमाचे आयुष्य का बर्बाद करत आहे?

तिच्या या फोटोवर खूप कमेंट येत आहेत. एका युजरने कमेंट करून लिहिले आहे की, ‘तू वनराजचा पिच्छा का सोडत नाहीये?’ दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘काव्या आता काय करणार अनुपमाचा घटस्फोट नाही होणार. मग आता तू जीव देणार की, वीरला सोडून अनिरुद्धकडे परत जाणार?’ अशा प्रकारे तिच्या फोटोंवर कमेंट येत आहेत.

मदालसा ही प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष शर्मा आणि अभिनेत्री शिला शर्मा यांची मुलगी आहे. तिने 2009 मध्ये एका तेलुगु चित्रपटातून तिच्या चित्रपट सृष्टीतील कारकीर्दीला सुरुवात केली होती. तसेच तिने अनेक तेलुगु आणि बॉलिवूड चित्रपटात देखील काम केले आहे. सध्या ती टेलिव्हिजन वरील ‘अनुपमा’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेतील तिच्या ‘काव्या’ या पात्राला सर्वत्र पसंती मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी पुढे आले मिलिंद सोमण; प्लाझ्मा दान करण्यासाठी करतायत जोरदार व्यायाम, पाहा व्हिडिओ

-खरंच! ‘मी दिशाला किस केले नाही’, असं का म्हणाला सलमान खान? पाहा बिहाईंड द सीन्स व्हिडिओ

-कोव्हिड पॉझिटिव्ह अभिनेता अनिरुद्ध दवेची प्रकृती गंभीर; पत्नीने फोटो शेअर केली भावुक पोस्ट, वाचून तुमचेही डोळे पाणावतील


Leave A Reply

Your email address will not be published.