Friday, March 29, 2024

दु:खद! तब्बल तीनशे सिनेमात काम केलेल्या दिग्गज अभिनेत्याचे निधन

मागच्या संपूर्ण वर्षाने आपल्याला अनेक कटू आठवणी दिल्या आहेत. जसं जसा २०२० चा शेवट जवळ येत होता, तसं तसं आपल्यावरील संकट वाईट घटना कमी होत आहे असे वाटू लागले होते, मात्र २०२० ने जाताजाता अगदी शेवटच्या दिवशी देखील आपल्याला दुःखद बातमी दिलीच.

वर्षाचा शेवट होत असताना ३१ डिसेंबरला तेलगू अभिनेते नरसिंग यादव यांचे हैदराबाद येथे दुर्दैवी निधन झाले.५२ वर्षाचे नरसिंग यादव बऱ्याच काळापासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. १५ मे १९६३ रोजी नरसिंग यांचा हैदराबाद येथे जन्म झाला. त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात त्यांनी १९७९ साली आलेल्या ‘हेमा हेमल्लू’ या तेलगू चित्रपटातून छोटी भूमिका साकारत पदार्पण केले. नरसिंग हे एप्रिल २०२० मध्ये कोमात गेले होते. त्यानंतर त्यांना किडनीच्या समस्यांनी ग्रासले म्हणून त्यांचे डायलिसिस चालू होते, मात्र यातच त्यांचे निधन झाले..

नरसिंग यांनी त्यांच्या ४० वर्षाच्या फिल्मी करियरमध्ये सुमारे ३०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी चित्रपटांमध्ये बहुतकरून कॉमेडियन, खलनायक आणि चरित्र भूमिका जास्त साकारल्या. राम गोपाल वर्मा यांच्या प्रत्येक सिनेमात नरसिंग यांची भूमिका ठरलेली असायची. नरसिंग यांनी तामिळ, तेलगू आणि हिंदी चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या.

नरसिंग यांच्या क्षणक्षणम, मनी मनी, पोकिरी, तुलसी, रगडा आदी चित्रपटांमधील भूमिका विशेष गाजल्या. नरसिंग यांचा शेवट सिनेमा २०१७ साली आलेला चिरंजीवी यांची मुख्य भूमिका असलेला, कैदी नं १५० हा होता. नरसिंग यांनी चित्रा यादव यांच्यासोबत लग्न केले होते, त्यांना रित्विक नावाचा एक मुलगा आहे.

 

हे देखील वाचा